शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहासह संतप्त जमाव तहसील कार्यालयात

By admin | Updated: July 7, 2015 01:38 IST

अधिकृतपणे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रविवारी झालेल्या कारवाईनंतर काही तासातच म्हणजे ...

कारवाईनंतर रेती व्यावसायिकाचा मृत्यू : तलाठी व तहसीलदारावर कारवाईची मागणीआष्टी (शहीद): अधिकृतपणे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रविवारी झालेल्या कारवाईनंतर काही तासातच म्हणजे रात्री १० वाजता ट्रॅक्टरमालक श्रीकृष्ण भुयार रा. गोदावरी याचा मृत्यू झाल्याने तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. या घटनेने संतप्त झालेल्या गोदावरी येथील नागरिकांनी संबंधित तलाठी व तहसीलदारावर कारवाईच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालयात मृतदेह घेऊन धडक दिली. दुुपारी २ वाजतापासून यावर कोणताही तोडगा निघाला नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यावर अखेर उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी नागपूर येथून येत नागरिकांशी चर्चा करीत ४८ तासांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर मृतदेह गोदावरी येथे नेण्यात आला होता. तोपर्यंत तहसील कार्यालयात मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. भुयार यांच्या ट्रॅक्टरने ईस्माइलपूर घाटातून रेती नेत असताना तलाठी ए.डी.जगताप यांनी रविवारी ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात आणला. त्याला १७ हजार ९०० रुपयांचा ठोठावला. तरीही रविवारी दुपारी ट्रॅक्टरमालकाच्या घरी जात २० हजारांची मागणी केली. तहसीलदारासह तलाठ्याचा दबाव वाढत असतानाच श्रीकृष्ण भूयार यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नागरिक करीत आहे. सोमवारी सकाळी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. यानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह तळेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. येथे तलाठी जगतापवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर मृतदेह घेऊन नागरिकांनी आष्टी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळविला. गोदावरी येथील शेकडो नागरिक तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदाराच्या कक्षात मृतदेह ठेवून तलाठ्याच्या निलंबनाची मागणी लावून धरली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक राजन पाली, आर्वीचे ठाणेदार शैलेश साळवी, कारंजाचे ठाणेदार चौधरी, तळेगावचे ठाणेदार दिनेश झामरे, आष्टीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्यासह ५० पोलिसांची कुमक तहसील कार्यालयात तैनात झाली. तहसीलदार मृदुलता मोरे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तलाठी जगताप यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला. यावरही गावकऱ्यांचे समाधान झाले नाही. तलाठी निलंबित झाल्याशिवाय मृतेदह हलविणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. आष्टी तहसील कार्यालयात सुमारे ३ तास तणावाचे वातावरण होते. तहसीलदार व तलाठ्याच्या भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पाठविणार असल्याची माहिती मृतकाचे भाऊ नंदकिशोर भुयार यांनी दिली. चौकशीच्या आश्वासनाने प्रकरण निवळले.(प्रतिनिधी)आरडीसी दीड तास वेटींगवर निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर दीड तास तहसीलदारांना वेट करा एवढेच सांगत होते. जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या नावाखाली वेळ नाही एवढाच संदेश देत होते. तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा मृतकाच्या नातलगांनी तहसीलदार मृदुलता मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. दरम्यान मोरे यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती चुकीची सांगितल्याने मृतकाच्या जावायाने त्यांना चांगलेच धारेवर धरले. एसडीओ नागपूरलाउपविभागीय महसूल अधिकारी शुभांगी आंधळे यांनी नागपूरला असून कारवाई आधी चौकशी करू, पाहू या उत्तराने नागरिक आणखीच संतप्त झाले होते.