शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल शिवची अन्न व औषधी विभागाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:31 IST

धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव येथे नगर परिषदेच्या कारवाईनंतर मंगळवारी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देअस्वच्छतेचा कळस : वैद्यकीय प्रमाणपत्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव येथे नगर परिषदेच्या कारवाईनंतर मंगळवारी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने तपासणी करण्यात आली. या तपासणीत पालिकेच्या सूचनेनंतरही कमालीची अस्वच्छता असल्याचे दिसून आले. यामुळे सदर हॉटेल मालकाला १५ दिवसांची सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. या १५ दिवसांत जर त्याने आवश्यक सुधारणा केल्या नाही तर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अन्न व औषधी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.अन्न व औषधी विभागाच्यावतीने मंगळवारी केलेल्या तपासणीत येथे अन्न झाकून नसल्याचे दिसून आले. शिवाय उरलेले उष्टे अन्न झाकून ठेवण्यात येत नसल्याचे दिसून आले. याच अन्नावर असलेल्या माशा इतर अन्नावर बसत असून त्यातून आजार पसरत असल्याचे निदर्शनास आले. पदार्थ तयार करण्याचे ठिकाणही उघड्यावर असल्याने येथेही अस्वच्छता दिसून आली. शिवाय कोणत्याही कारागिराच्या अंगावर अ‍ॅपरॉन नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी केलेले नसल्याचे प्रमाणपत्र येथे नसल्याचे दिसून आले आहे. या बाबी नियमांना बगल देणाºया असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हॉटेलवर पालिकेच्यावतीने करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचे दिसून आले. यात आता पुन्हा अन्न व औषधी विभागाच्यावतीने आज येथे धाड घातली. या धाडीतही येथे अनियमितता असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या हॉटेलावर कारवाई अपेक्षित आहे. या तपासणीच्यावेळी अन्न व औषधी प्रशासनाचे रविराज धाबर्डे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.‘लोकमत’च्या वृत्तानंतर कारवाईपालिकेच्यावतीने केलेल्या कारवाईनंतर या हॉटेलावर अन्न व औषधी विभागाच्यावतीने तपासणी होणे गरजेचे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अन्न व औषधी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.पालिकेने केला होता पाच हजारांचा दंडपालिकेच्यावतीने सोमवारी या हॉटेलावर धाड घातली. या धाडीत येथे अस्वच्छता असल्याचे दिसून आल्याने या हॉटेल मालकाला पालिकेच्यावतीने पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेच्यावतीने आणखी एक वेळा धाड टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही कमतरता असल्यास थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.