शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तप्त उन्हात चौकार-षटकारांची बरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 02:29 IST

अबे बॉल स्टंप ला लागला ना यार, तू आऊट झाला, तु नेहमीच चिडी खेळतो... आरं नाही बावा बॉल दुरून गेला... बॉल टाक आऊट वगैरे नाही न रे....

पराग मगर  वर्धाअबे बॉल स्टंप ला लागला ना यार, तू आऊट झाला, तु नेहमीच चिडी खेळतो... आरं नाही बावा बॉल दुरून गेला... बॉल टाक आऊट वगैरे नाही न रे.... असे खोडकर पण गोड संवाद सध्या शहरात, गावोगावी गल्ल्यागल्ल्यांमध्ये, शाळांच्या मैदानांवर भर उन्हात ऐकायला मिळत आहेत. यात अनेकदा भांडणेही होतात. पण ती तात्पुरती. लगेच कट्टी आणि बट्टी होऊन गल्लीतील क्रिकेट टीम पुन्हा खेळायला सज्ज होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांचा आवडता खेळ असलेल्या क्रिकेटची सध्या सर्वत्र धूम सुरू आहे. आयपीएलचा ज्वर आत्ताच उतरला असला तरी क्रिकेटचा ज्वर मुलांमध्ये आताकुठे चढायला लागला आहे. वर्दळ असतानाही गावांतील गल्ल्यांमध्ये मुलांचा क्रिकेटदंगा पहावयास मिळत आहे. गावांतील शाळांची मैदाने, खाली भूखंडांवरही मुलांची गर्दी पहावयास मिळत आहे.क्रिकेट हा खेळच मुळात श्रीमंतांचा कमी आणि गरिबांचाच जास्त, त्यातल्या त्यात गल्ली क्रिकेटसाठी तर खूप खर्च नसतोय. साधी बॅट, प्लास्टिकचा बॉल, स्टंप म्हणून खर्ची, सायकलचा रिंग, टायर, साध्या तीन काड्या आणि दुसरीकडे एखादी वीट किंवा दगड असे कुठलेही साधन चालते. तसेच खूप जास्त जागेचाही सोस नसतो. गडीही चार, पाच असेल तरी काम भागते. मॅचही कमीत कमी ओव्हरची, असा सुटसुटीत खेळ असल्याने गल्ल्यागल्ल्यांमध्ये सध्या क्रिकेटच्या मॅचेस व्हायला लागल्या आहे. त्यात मग एका गल्लीतील मुलांची दुसऱ्या गल्लीतील मुलासोबत मॅचही असते. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार दुपारच्या रणरणत्या उन्हा सुरू असतो. पालकांकडून सुरुवातीला होत असलेला विरोध हळूहळू मावळू लागतो. कारण मुलांना खेळू नका म्हणून सांगणं म्हणजे स्वत:च्या झोपेचा खोळंबा करून घेणे असते. त्यामुळे त्यांनी खेळलेलेच बरे असे म्हणत मुलांना खेळण्याची मुभा दिली जाते आणि अबे तू आऊट म्हणत सायंकाळी खेळ संपतो. सुट्ट्या संपायला अद्याप अवकाश आहे. त्यामुळे तोपर्यंत दररोज हेच चित्र नजरेस पडते.