शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाला लेटलतिफीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:33 IST

ग्रामीण रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने आरोग्य केंद्र आणि रुग्णालय सुसज्ज करण्यात येत आहे. मात्र येथे कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देवरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : ग्रामीण रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने आरोग्य केंद्र आणि रुग्णालय सुसज्ज करण्यात येत आहे. मात्र येथे कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो. सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार वाढीस लागला आहे. येथे कार्यरत कर्मचारी, अधिकाऱ्यांची लेटलतिफी नित्याची बाब झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी असतानाही रुग्णांची तपासणी करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी नसणे. तर कधी बदली अधिकारी येण्यापूर्वीच रुग्णालय सोडणे, रुग्णांची निट तपासणी करणे यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. रुग्णालयाची मुख्य जबाबदारी असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. अधिकारीच १२ नंतर रुग्णालयात येत असेल तर रुग्णांची ताटकळ होणारच. हा प्रकार गुरुवारला पाहायला मिळाला. बाह्य रुग्ण विभागाचा नोंदणी कक्ष वेळेवर सुरू झाला असला तरी ११ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने एन.सी.डी. क्लिनिक विभागात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षेत रुग्ण तपासणी केली. येथे मधुमेह व रक्तदाबाची तपासणी होते. त्यामुळे मधुमेह तपासणीसाठी रुग्णांना लांबलचक रांगेत उभे राहावे लागले. घोराड ग्रामपंचायतचे सदस्य त्रिशुल राऊत हे याचवेळी रुग्णालयात गेले असता त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामीण रुग्णालयात आलेल्या बहुतांश रुग्णांना अनेकदा सेवाग्राम किंवा सावंगीला पाठविले जाते. रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देऊन कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.रुग्णांची होते ताटकळरुग्ण कल्याण समिती या रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी नेमली तरी यात अधिकारीच सदस्य आहे. समितीची सभा नाममात्र होत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेटलतिफमुळे येथील सहाय्यक वैद्यकीय अधिक्षकांना अनेकदा रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे प्रकार घडले. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.एन.सी.डी. क्लिनिकची वेळ बदलवामधुमेह व रक्तदाबाच्या तपासणीसाठी एन.सी.डी. क्लिनिकमध्ये तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. हे क्लिनिक १० वाजता सुरू होते. त्यामुळे वेळेत बदल करून सकाळी ८ वाजता सुरू केल्यास रुग्णांना गावाला जाणे सोयीचे ठरू शकते.दोन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणीबाह्यरुग्ण विभागात रुग्णांची वाढलेली गर्दी पाहता सकाळपाळीत रुग्ण तपासणीकरिता येथे दोन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी आहे. एकच अधिकारीआसल्याने रुग्णांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. यात वेळेचाही अपव्यय होत असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करतता.