शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

रुग्णालय वसाहतीचे बांधकाम चार वर्षांपासून रखडलेले

By admin | Updated: April 14, 2017 02:19 IST

विकास कामासाठी लाखो रुपये आणून भूमिपूजन उरकले जाते; पण तीे कामे चार वर्षांतही पूर्ण होत नसल्याने विकास कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

२०१३ मध्ये झाला कामाला प्रारंभ : कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हसेलू : विकास कामासाठी लाखो रुपये आणून भूमिपूजन उरकले जाते; पण तीे कामे चार वर्षांतही पूर्ण होत नसल्याने विकास कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. येथील रुग्णालयाच्या वसाहतीचे काम चार वर्षांपासून खितपत पडले आहे. यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देत बांधकाम त्वरित पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. सेलू ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन आमदारांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते. बांधकाम विभागाकडून सदर कामाचे ३ कोटी ४९ लाख १५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदारानेही त्वरित बांधकामाला सुरूवात केली. एक वर्षात हे काम पूर्ण होईल. अधिकारी व कर्मचारी रुग्णालय परिसरातच राहतील. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली व तत्पर सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते; पण चार वर्षांचा कालावधी लोटला असताना बांधकामाची कासव गती कायम आहे. हे बांधकाम कधी पूर्ण होणार, ही प्रतीक्षा कायम आहे. या कामाला आजपासून किती वर्ष लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची काम करून घेण्याची गती मंदावण्यामागचे नेमके कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. निवासस्थाने नसल्याचे कारण पूढे करून कर्मचारी मात्र जिल्हा तसेच उपराजधानीच्या ठिकाणावरून ये-जा करीत आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या लेटलतिफीचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. हे काम पूर्ण करण्याचा तसेच काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरूस्तीचा कालावधीही इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच संपलेला आहे. तालुक्यात बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही वसाहत बांधली जात असताना कामाची गती मंदावली आहे. लोकप्रतिनिधी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वसाहतीचे बांधकाम त्वरेने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)आधी कामाला सुरूवात, नंतर भूमिपूजन३ कोटी ४९ लाख १५ हजार रुपयांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाला ३० मार्च २०१३ रोजी सुरूवात झाली होती. यानंतर तब्बल २५ दिवसांची या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कामाला सुरूवात झाल्यानंतर भूमिपूजन झाल्याची बाब तेथे लावलेल्या फलकावरूनच समोर येत आहेकाम पूर्ण करण्याचा कालावधी संपलाकामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्यापासून १३ महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचा लिखित करार झाला होता. यानुसार मुदत ३० एप्रिल २०१४ रोजी संपली. दोन दुरूस्तीचा कालावधी २४ महिन्यांचा होता. ती मुदतही पूर्ण झाली आहे; पण अद्याप या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले नाही.