शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय झाले फुल्ल; पण कोविड केअर सेंटर रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित कोरोनाग्रस्तांना सध्या स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, अनेक व्यक्ती अलगीकरणासाठी घरात वेगळी व्यवस्था नसतानाही होम आयसोलेशनची मागणी करीत आहेत, तर काही सुजाण ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त स्वत:च खबरदारीचा उपाय म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याची इच्छा दर्शवित आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यात सात सीसीसी सेंटर : ४१८ बेडची व्यवस्था, दाखल रुग्ण ५१

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सात ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले. यात एकूण ४१८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, सध्या तेथे केवळ ५१ ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही मोठ्या कोविड रुग्णालयांतील सर्वच खाटा फुल्ल आहेत.कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित कोरोनाग्रस्तांना सध्या स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, अनेक व्यक्ती अलगीकरणासाठी घरात वेगळी व्यवस्था नसतानाही होम आयसोलेशनची मागणी करीत आहेत, तर काही सुजाण ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त स्वत:च खबरदारीचा उपाय म्हणून कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याची इच्छा दर्शवित आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण सात कोविड केअर सेंटर असून, त्यात तब्बल ५१ ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. कोविड केअर सेंटरमधील तब्बल ३६८ रुग्णखाटा सध्या रिक्त आहेत. असे असले तरी भविष्यातील धोका लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोविड विषाणूच्या संसर्गाला प्रभावीपणे ब्रेक लावण्यासाठी ज्या कोविड बाधिताच्या घरी गृहअलगीकरणाची वेगळी व्यवस्था नाही अशांना सीसीसी केंद्रांत ठेवले गेले पाहिजे.

रुग्णांसाठी बेड मिळविण्याकरिता वणवणजिल्हा प्रशासनाने ‘ई-सेवा वर्धा डॉट इन’ हे संकेत स्थळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर केला असला तरी अनेक रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड हॉस्पिटल मधील ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडसाठी वणवण भटकंतीच करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षकोविड रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच सर्वसाधारण बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना माहिती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०७१५२-२४३४४६ या क्रमांकावर कॉल केल्यावर कुठल्या रुग्णालयात खाट रिक्त, याची माहिती नागरिकांना दिली जात आहे.

आयसीयू, ऑक्सिजन अन् व्हेंटिलेटर बेड फुल्लसेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाच्या कोविड युनिटमधील आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड सद्यस्थितीत फुल्ल आहेत. त्यामुळे सध्याच्या काेविड संकटाच्या काळात प्रत्येक वर्धेकराने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल