शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक वाघाच्या दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:49 IST

तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन झाले तेथून उमरी हे गाव अवघ्या ६०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील शालेय विद्यार्थी वाघाच्या दहशतीमुळे शाळेत जाण्यास नकार देत आहेत. उमरी येथील जि.प. शाळा व सोहमनाथ विद्या मंदिर हे गावाबाहेर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आणि शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापकांनी मार्गदर्शनात्मक सूचना दिल्या आहेत. यापूर्वी सोमवारी खैरी, कारंजा जुनी, दुग्ध डेअरी परिसरात काहींनी वाघाला बघितल्याचे सांगितले जाते. तर दोन दिवसांपूर्वी लिंगा या गावातील चार गार्इंवर वाघाने हल्ला केला होता. तर एका गायीचा फडशा पाडला. शिवाय तालुक्यातील परसोडी, काकडा, जसापूर, नरसिंगपूर या भागात काहींना व्याघ्र दर्शन झाल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. याशिवाय जंगलव्याप्त कन्नमवारग्राम, आजनडोह, ढगा, बांगडापूर, रहाटी, काजळी, सिंदीविहिरी, सुंसंद, सहेली, मासोद या परिसरात यापूर्वीच वाघाची दहशत पसरविली होती. आता याच वाघाने आपला मोर्चा गाव शिवरांकडे वळविल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यातील काही गाव वाघाच्या दहशतीत असले तरी भटकंती करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाºयांना अद्यापही व्याघ्र दर्शन झाले नसल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Tigerवाघ