शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:33 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना ७० व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अखंड सुत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे ४.४५ वाजता घंटाघर ते बापू कुटी अशी रामधून प्रभात फेरी काढण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रम : १२ तासात ३१ हजार मिटर सुतकताई; सामूहिक प्रार्थना आणि रामधून

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना ७० व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी अखंड सुत्रयज्ञाने आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे ४.४५ वाजता घंटाघर ते बापू कुटी अशी रामधून प्रभात फेरी काढण्यात आली. बापूकुटी परिसरात सर्वधर्म प्रार्थना झाल्यानंतर सकाळी ६ वाजता अखंड सूत्रयज्ञाला प्रारंभ झाला.सकाळी सुरू झालेल्या सुतकताईचा शेवट सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला. या १२ तासात येथे एकूण ३१ हजार मिटर सुतकताई झाल्याची माहिती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.कार्यकर्ता आणि दक्षिणायनचे सहकारी यांनी आश्रम परिसरात श्रमदान केले. सायंकाळी ५.३० ते ६ पर्यंत प्रार्थनाभूमीवर सामूहिक सुत्रयज्ञ झाल्यानंतर दैनिक सायंप्रार्थना झाली. बापू कुटी परिसरात सर्वधर्म भजने झाली. यात आश्रम, नई तालीम समिती, सर्व सेवा संघ, वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ, दक्षिणायन आदि ठिकाणचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप आ. आशिष देशमुख यांनी भेट देवून बापुकुटीत प्रार्थना केली. सकाळला कुसुम पांडे, शिवचरण ठाकूर, नामदेव ढोले, शोभा कवाडकर यांनी सुतकताईला प्रारंभ केला.महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांची उपस्थितीमहात्मा गांधी यांच्या ७० व्या पुण्यतिथी दिनी त्यांचे नातू राजमोहन गांधी यांची विशेष उपस्थिती आकर्षणाचे कारण ठरले. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती येथे येणाऱ्यांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरले. येथे आयोजित समास २०१८ या कार्यक्रमानिमित्त हे दोघे येणार असल्याची माहिती नागरिकांना मिळताच येथे नागरिकांची चांगलीच उपस्थिती होती. शिवाय या कार्यक्रमादरम्यान या दोघांची झालेली भाषणे सर्वांनी ऐकली. दोघांनीही येथील यात्री निवासात सध्या असलेल्या प्रश्नांवर चर्चा केल्याची माहिती आभम प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.