शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

३० क्विंटल कापसासह घरातील साहित्य खाक

By admin | Updated: January 3, 2017 00:54 IST

ब्राह्मणवाडा येथे सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक लागलेल्या आगीत दोन घरांतील साहित्यांसह घरात

ब्राह्मणवाडा येथील घटना : आग विझल्यावर आला अग्निशमन बंब आकोली : ब्राह्मणवाडा येथे सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक लागलेल्या आगीत दोन घरांतील साहित्यांसह घरात असलेला ३० क्विंटल कापूसही आगीच्या भक्षस्थानी आला. ज्या दोन घरांना आग लागली त्या घरातील नागरिकांच्या अंगावरील कपड्याव्यतिरिक्त काहीच उरले नाही. ग्रामस्थांनी शर्र्थीचे प्रयत्न करून आग विझवली; पण तोपर्यंत साहित्याचा कोळसा झाला होता. आग लागली त्यावेळी अग्नीशमन यंत्राला कल्पना देण्यात आली; मात्र सदर वाहन आग विझविल्यानंतर दाखल झाले. आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. येथील वेणुबाई काळे यांच्या घरात आगीने भडका घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत बाजूच्या शंकर राजेराम काळे यांच्या घरालाही कवेत घेतले. यात दोन्ही घरांची राख रांगोळी झाली. वेणुबाई यांच्या घरी ठेवलेला २० क्विंटल कापूस तर शंकर काळे यांच्या घरातील १० क्विंटल असा एकूण ३० कापूस आगीच भक्ष्यस्थानी पडला. घरातल टिव्ही, फ्रिज, दिवाण या वस्तूंसह दैनंदिन वापरातील भांडी अन्नधान्य, कपडे जळून खाक झाले. घरातील मंडळीच्या अंगावरचे कपडेच शिल्लक राहिले. ग्रामस्थांनी आग विझविली. मात्र तोपर्यंत दोनही घरांचा कोळसा झाला होता. हे दोन्ही कुटुंब उघड्यावर पडले असून शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. तलाठी के.सी. मेश्राम यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. (वार्ताहर) चालत्या ट्रॅक्टरला आग ४चिकणी (जामणी) - ऊसाचा पाला भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला सोमवारी सकाळी आग लागली. हा ट्रॅक्टर ऊसाचा पाला घेऊन चिकणी-वर्धा मार्गाने जात होता. चिकणी गावाजवळ भाष्कर काकडे यांच्या शेतात वाकलेल्या पोलवर असलेल्या वीज तारांचा स्पर्श या ट्रॅक्टरला झाला. यातूनच ठिणगी पडल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आग लागली. याची माहिती रस्त्याने जात असलेल्या गावकऱ्यांना होताच त्यांनी ही माहिती काकडे यांना दिली. यावेळी शेतात असलेल्या पाण्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. आग विझविण्याकरिता शेख सिकंदर, पोमा डायरे, नौशाद शेख, अमोल पारोदे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच ट्रॅक्टर चालक मंगेश राऊत रा. पडेगाव, मालक राजु दहाघाने, पडेगाव यांनी सुध्दा सतर्कतेने ट्रॅक्टरचा समोर चा भाग काढून घेतल्याने अनर्थ टळला.(वार्ताहर) तलाठी अहवाल प्राप्त होताच त्या दोन्ही कुटुंबांना तातडीने मदत केली जाईल. - विलास कातोरे, नायब तहसीलदार, कारंजा (घा.)