शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरघुती पाणी मापक मीटरची तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:36 IST

गत सहा महिन्यांपूर्वी स्थानिक ग्रा.पं.ने परिसरातील नळांना मीटर लावले. त्यावरिल रिडींग वरून नागरिकांना पाणी वापराचे देयकही दिल्या जाते.

ठळक मुद्देदहा जणांना दंड : ग्रामपंचायतची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : गत सहा महिन्यांपूर्वी स्थानिक ग्रा.पं.ने परिसरातील नळांना मीटर लावले. त्यावरिल रिडींग वरून नागरिकांना पाणी वापराचे देयकही दिल्या जाते. परंतु, अनेक जण मीटरमध्ये तांत्रिक बिघाड तयार करून ग्रा.पं.चा महसूल बुडवित असल्याची माहिती मिळताच ग्रा.पं.च्यावतीने मीटर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही अनुचित प्रकार समोर आल्यामुळे दहा जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.घोराड येथील नागरिकांना नळ योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. ही योजना सुरू करताना पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून नळांना मीटर बसविण्यात आले. गत काही महिन्यापासून सदर मीटरचे रिडींग घेऊन नागरिकांना युनिट प्रमाणे देयकही देण्यास सुरुवात झाली; पण नळाला लावलेले मीटर सुस्थितीत आहे किंवा नाही याची शाहनिशा करण्यात येत नव्हती. दरम्यान सरपंच ज्योती घंगारे, ग्रामविकास अधिकारी संजय धावडे, पं. स. सदस्य अमीत तेलरांधे, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष गणेश खोपडे, सचिव रामेश्वर घंगारे, ग्रा.पं. सदस्य गोपाळ माहुरे, गणेश महाजन, प्रशांत वैरागडे यांनी नळावरील मिटर तपासणीची मोहीम राबविली. यात दहा जणांच्या मिटरमध्ये बिघाड आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला. ग्रामपंचातीच्यावतीने राबविण्यात आलेल्या सदर मोहिमेत ग्रा. पं. कर्मचारी दिवाकर माहुरे, प्रविण मस्के, सागर भांदककर आदी सहभागी झाले होते.अनेक गैरप्रकार चव्हाट्यावरराबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान काही नागरिकांनी मिटरमध्ये सुईने छीद्र करून मिटर बंद केल्याचे, मिटर काढून पाणी वापरण्यात येत असल्याचे, मिटर जोडणीच्या सुरुवातीला टी लावून पाणी वापरत असल्याचे आढळून आले. यावेळी दोषी आढणाºया दहा जणांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.