शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

हुतात्मादिनी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली परेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:07 IST

पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देएसपींनी वाहिली आदरांजली : पोलीस अधिकाºयांसह प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस मुख्यालय येथे हुतात्मादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने सकाळी ७.४५ ते ९.१५ वाजताच्या दरम्यान पोलीस मुख्यालय येथे हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परेडचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला जिल्ह्यातील २५ पोलीस अधिकारी व १४५ पोलीस कर्मचारी तसेच जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. राखीव पोलीस निरीक्षक उईके यांनी शोक परेडचे संचालन केले. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.२१ आॅक्टोबर १९५९ ला लदाख हद्दीतील भारत तिबेट सिमेवर बसलेल्या हॉट स्प्रिंग येथे सोळा हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० पोलीस शिपायांची तुकडी गस्त घालीत असताना अकस्मात त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लाची चाहूल लागताच मातृभूमीच्या रक्षणार्थ अपूरे मनुष्यबळ व अपूरे शस्त्रास्त्र यांची पर्वा न करता १० पोलीस जवान प्राणपणाने लढले. मातृभूमीच्या रक्षणार्थ या शुरवीरांनी मोठ्या संख्येने असणाºया शत्रुंशी लढा देत आपल्या प्राणांची आहूती दिली. तब्बल २१ दिवसानंतर १३ नोव्हेंबर १९५९ ला चिनने या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केले. तेव्हा सारा देश हळहळला होता. आमच्या सुखकर भविष्यकाळासाठी या १० शिलेदारांनी त्यांचा जागृत वर्तमान समर्पित केला. त्या हॉटस्प्रिंगच्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी देशभरात हा दिवस हुतात्मादिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी समस्त भारतात ज्या पोलीस दलातील जवानांनी आपले कर्तव्य पार पाडतांना हुतात्म पत्करले अशा सर्व वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना देशातील पोलीस दल मानवंदना देवून श्रद्धांजली अर्पण करीत असतो. १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१७ दरम्यानच्या काळात ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा एकूण ३७९ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश असून महाराष्ट्रातील एक कर्मचाºयाचा समावेश आहे. त्यांना पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी मानवंदना अर्पण केली.पोलीस मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात वीर शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी सुरूवातीला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांनीही आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनीही मानवंदना देवून स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण केले. शोक परेडच्या वेळी शहीदांच्या नावाचे वाचन पोलीस निरीक्षक पराग पोटे व पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे यांनी केले. संचालन मोहंडळे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.