शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:34 IST

दगडफोड्या ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वच बहुजन मोक्ष मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत; पण जगात मोक्ष मिळाल्याची कुठेच नोंद नाही, हे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा होता.

ठळक मुद्देगंगाधर बनबरे : छत्रपती शिवाजी महाराज, एक लोककल्याणकारी राजे विषयावर शिवव्याख्यान

आॅनलाईन लोकमतआर्वी : दगडफोड्या ते वैज्ञानिकांपर्यंत सर्वच बहुजन मोक्ष मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत; पण जगात मोक्ष मिळाल्याची कुठेच नोंद नाही, हे वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू-मुस्लीम व रयतेच्या ऐक्याचा होता. ढाल, तलवारी पलिकडेही त्यांचे रयतेच्या हितार्थ बहुमूल्य कार्य आहे. यासाठी दगाबाज इतिहासकारांची दांभिक वृत्ती बहुजनांनी लक्षात घेण्याची गरज आहे, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रसिद्ध प्रवक्ता गंगाधर बनकरे यांनी दिला.मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी ६ वाजता गांधी विद्यालय येथे शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज, एक लोककल्याणकारी राजे’ असा प्रबोधनाचा विषय होता. यावर ते बोलत होते. लढाई पलिकडचे शिवाजी महाराज यावर बनबरे यांनी विचार मांडून शिवरायांनी रयतेसाठी केलेले लोककल्याणकारी कार्य, महाराजांचा लढायांपलिकडचा जाज्वल्य इतिहास कथन केला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष अंधारे तर प्रमुख अतिथी म्हणून राहुल ठाकरे, बाळा नांदुरकर उपस्थित होते.ठाकरे यांनी शिवरायांच्या स्वराज्यात शेतकरी व रयतेला आपले राज्य व राजाबाबत किती आस्था, आदर होता. जीवा-भावाची सर्वजाती धर्माची माणसं शिवरायांनी जोडली व स्वराज्य स्थापन केले. जगाच्या पाठीवर असा अलौकिक राजा पुन्हा होणे नाही, असे सांगितले. नांदुरकर यांनीही छत्रपती शिवरायांचे ॠण भारतीय समाज कधीही फेडू शकणार नाही, असे सांगितले.राजमाता जिजाऊ, शिवराय व गाडगे महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक विरेंद्र कडू यांनी केले. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्र जाणे यांनी छत्रपतींच्या राजमुद्रेबाबत माहिती दिली. यावेळी राजू वानखडे, सुधीर गिºहे, मंगेश विधळे, योगिता इंगळे, संजय इंगळे, उपाध्यक्ष वंदना गावंडे, निरज बुटे, मंगेश जगताप, राजू वानखडे उपस्थित होते. संचालन प्रफुल्ल क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा. विजय चौधरी यांनी मानले. यावेळी राहुल ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, आशा चौधरी, वैशाली ठाकरे, बाल नगराध्यक्ष ध्रुव शेंडे आदींचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.