शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इसमाचा मृतदेह रात्रभर रेल्वे रूळाशेजारीच

By admin | Updated: May 29, 2017 01:06 IST

पुलगाव लगतच्या वर्धा नदीवरील रेल्वे पुलाजवळ रेल्वे अपघातात एक इसमाचा मृत्यू झाला.

तब्बल १२ तासांनी उचलला मृतदेह लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पुलगाव लगतच्या वर्धा नदीवरील रेल्वे पुलाजवळ रेल्वे अपघातात एक इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना होताच त्यांनी मृतदेह उचलून रूळाशेजारी ओट्यावर ठेवला. तो सकाळपर्यंत तसाच राहिला. तब्बल बारा तासांनी रेल्वे पोलीस घटनास्थळी येत पंचनामा करून रविवारी सकाळी १० वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. हरिष ठाकरे असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. हरिष आपले काम आटोपून घराकडे जात असताना रेल्वेने दिलेल्या धडकेत गतप्राण झाला. याची माहिती रेल्वे पोलिसांना वेळीच मिळाली नसती तर मृतदेह रात्रभर दुर्लक्षित होणे स्वाभाविक आहे. घटनेच्या माहितीनंतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते रेल्वे रूळावरील मृतदेह उचलून बाजूला ठेवत त्याकडे दुर्लक्ष करणे हे रेल्वे पोलिसांच्या असहिष्णुतेचे दर्शन घडविणारे आहे. घटना माहिती झाल्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करीत पुढील कारवाईसाठी पाठविणे क्रमप्राप्त होते. मात्र येथे तसे झाली नाही. मृतदेह तब्बल १२ तास तसाच पडून राहिला. घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पंचनामा व्हायचा आहे असे म्हणत मृतदेह देण्यास नकार दिला. यावेळी रेल्वे रूळावर बराच वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्या इसमाची ओळख पटली नाही वर्धा : दहेगाव ते कवठा दरम्यानच्या रेल्वे मार्गावर गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या इसमाला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्यापही त्या इसमाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. पुलगाव जीआरपीएफला एकच कर्मचारी पुलगाव रेल्वे स्टेशनवर असलेल्या पोलीस चौकीत एकच कर्मचारी कार्यरत आहे. एकाच कर्मचाऱ्यांवर भार असल्याने हा घडल्याचे सांगण्यात आले.