शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी ते हिंगणा रस्ता खड्ड्यात

By admin | Updated: September 10, 2016 00:36 IST

हिंगणी ते हिंगणा हा मार्ग दोन जिल्ह्यांच्या सिमेला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे.

अपघाताचा धोका : रस्त्यावर मोठ-मोठे भगदाड सेलू : हिंगणी ते हिंगणा हा मार्ग दोन जिल्ह्यांच्या सिमेला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे. मात्र या रत्यावर खड्डेच-खड्डे असल्याने वाहतुकीकरिता गैरसोयीचा ठरत आहे. या रस्त्यावरील नाल्याला पावसाळ्यात पूर येत असल्याने वाहतुकीला अडचण होते. रस्त्याची डागडुजी करुन नाल्याचे पक्के बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावरील नाला अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. बांधकाम विभागाकडून याची कोणतीच डागडुजी केली जात नसल्याचे दिसते. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना हा रस्ता कमी अंतराचा असून प्रवासाचा वेळ वाचविणारा आहे. मात्र रस्त्याची दैनावस्था झाल्याने या मार्गाने कमी वर्दळ असते. सदर रस्ता हिंगणी, हिंगणा, वाडी, नागपूर असा जातो. पण या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने वाहनचालक या रस्त्याने जाण्याचे टाळतात. रस्त्यावर खड्डेच आहे. चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. हिंगणी येथून देवनगर, वानरविहरा नंतर २ कि़मी. अंतरावर जिल्ह्याची सीमा आहे. या सिमेपासून तर हिंगणीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहे. या मार्गाने जडवाहनाची वर्दळ असते. वानरविहरा पासून काही अंतरावर नाला आहे. हा नाला वळणरस्त्याला लागून आहे. या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. पाण्याच्या प्रवाहाने पुलाच्या खालील माती वाहुन जाते. त्यामुळे तेथे भगदाड पडले आहे. दिवसेंदिवस नाल्याची रूंदी वाढत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. रात्रीच्यावेळी वाहन चालकांनी सतर्कता न बाळगल्यास दुर्घटना अटळ आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)पर्यटकांकरिता रस्ता डोकेदुखीचाबोर व्याघ्र प्रकल्पाकरिता बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक येथे येतात. त्यांना येण्याकरिता हिंगणी मार्ग सोयीस्कर आहे. बोरधरण येथे येण्यासाठी वाडी, नागपूर, हिंगणा हा मार्ग कमी अंतराचा ठरतो. जंगल सफारीसाठी अनेकजण याच मार्गाने जातात. मात्र वाहन चालकांना खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्ता खचला असल्याने पावसाळ्यात धोका वाढला आहे. याची दखल घेणे गरजेचे ठरत आहे.