शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट, वर्धेत तूर खरेदी केंद्र सुरू

By admin | Updated: January 4, 2017 00:31 IST

तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते.

शेतकऱ्यांना दिलासा : कृउबास संचालकांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा वर्धा : तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. व्यापारी भाव पाडून तुरी खरेदी करतात. यामुळे शासकीय खरेदी केंद्राची गरज होती. ही बाब लक्षात घेत वर्धा व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यावरून हिंगणघाट व वर्धा बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, संचालक रमेश खंडागळे, जगदीश मस्के, पवन गोडे, कमलाकर शेंडे, पुरूषोत्तम टोणपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीप्रमाणे तुरीची खरेदी करण्याची मागणी केली होती. शासनाने तुरीला ४ हजार ६२५ व बोनस ४२५ असे ५ हजार ५० या भावाने तुरीची खरेदी करण्याचे जाहीर केले होते. वर्धा बाजार समितीच्या यार्डवर तुरी खरेदी करण्याची मागणी होती. यावरून वर्धा बाजार समितीत ५ हजार ५० प्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. बुधवारी तूरीच्या खरेदीचे रितसर उद्घाटन वर्धा बाजार समितीत देशमुख यांच्या हस्ते होणार असून शेतकऱ्यांनी शेतमाल आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(लोकमत न्यूूज नेटवर्क) हिंगणघाट येथे खरेदी केंद्र सुरू हिंगणघाट - शासनाने निश्चित केलेल्या किमतीनुसार बाजार समितीच्य्े ाा आवारात तूर या शेतमालाची खरेदी व्हावी, याची व्यवस्था करण्याची मागणी होती. यावरून नाफेड अंतर्गत ५ हजार ५० रुपये दराने छत्रपती शिवाजी मार्केट यार्डवर शेड क्र. ६ मध्ये खरेदी केली जात आहे. काट्याचे पूजन करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी नाफेडला आधारभूत किमतीने तूर द्यावी. रक्कम धनादेशाने देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, उपसभापती हरिष वडतकर व संचालक हजर होते.