शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात हिंगणघाट तालुक्याची कामगिरी ढेपाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८७५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ६१ हजार ३७६ व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज १२ हजार २०० व्यक्तिंना लसीकरण करण्याचे जिल्ह्याला उद्दिष्ट असले तरी सध्या लस तुटवड्याचा परिणाम या लसीकरण मोहिमेवर होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १७.२२ तर हिंगणघाटात केवळ ९ टक्के लाभार्थींना दिली कोविडची व्हॅक्सिन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३ लाख ३ हजार २५१ डोस आतापर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. असे असले तरी १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या महालसीकरण माेहिमेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत हिंगणघाट तालुका शेवटून पहिला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तेथे आतापर्यंत लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे ५२ हजार ८७५ डोस देण्यात आले असून, त्याची टक्केवारी ९ इतकी आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८७५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ६१ हजार ३७६ व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज १२ हजार २०० व्यक्तिंना लसीकरण करण्याचे जिल्ह्याला उद्दिष्ट असले तरी सध्या लस तुटवड्याचा परिणाम या लसीकरण मोहिमेवर होत आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले. त्यावेळी १ लाख १९ हजार ७८० व्यक्तिंना लसीचा पहिला, तर २३ हजार २३५ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ताे विक्रम अजूनही कायम आहे. लसीकरण मोहिमेला गती देत एप्रिल महिन्यातील विक्रम मोडत नवा विक्रम नोंदविण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. पण, जिल्ह्याला दिली जात असलेला अल्प लससाठा त्यासाठी बाधा ठरत आहे. लसीकरण मोहिमेला गती मिळावी म्हणून थेट जिल्हाधिकारीही विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मी लस नाही घेतली कारण...

कोविड संकटात व्हॅक्सिन किती महत्त्वाची आहे, याची जाण आपल्याला आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस देणे बंद आहे. त्यामुळे आपल्याला लसीकरणाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात लवकरात लवकर १८-४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करावे.- मोहित वांदिले, वर्धा. 

आपण घरबांधकामाचे कंत्राट घेतो. मागील काही दिवसांपासून व्यस्त राहिल्याने तसेच घराशेजारील केंद्रावर अतिशय अल्प लससाठा उपलब्ध होत असल्याने आपण लस घेण्याचे टाळले. पण, आता आपण लस नक्कीच घेणार आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनी लस घेतली आहे.- अरुण जेंगठे, सिंदी (मेघे). 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या