शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

हिगणघाटची ऋतिका जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:17 IST

शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका रामनरेश साहु हिने ६५० पैकी ६३७ गुण (९८ टक्के) प्राप्त करीत जिल्ह्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे.

ठळक मुद्देबारावीचा जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के : १७ हजार ५४० पैकी १७ हजार ५२८ विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतिका रामनरेश साहु हिने ६५० पैकी ६३७ गुण (९८ टक्के) प्राप्त करीत जिल्ह्यात पहिली येण्याचा मान पटकाविला आहे. सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेनेच दिला आहे.जिल्ह्यात द्वितीय स्थानावर दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात न्यू इंग्लीश हायस्कूल वर्धा येथील विज्ञान शाखेची श्रूती संतोष मुरारका तथा आर.के. कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव येथील प्रज्वल यशवंत घाटे यांनी ६२४ (९६ टक्के) गुण प्राप्त केले आहेत. तृतीय स्थानावर जे.बी. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेत्रा विजय कडू हिने ६२३ (९५.८४ टक्के) गुण प्राप्त करीत तृतीय स्थान प्राप्त केले आहे.यंदा जिल्ह्यातील १२४ उच्च माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील १७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. यातील १७ हजार ५२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले होते. यापैकी १४ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला आहे. हा निकाल मागील वर्षीपेक्षा कमी असल्याने निकालाची टक्केवारी घटल्याचेच दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी दुपारी १ वाजता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याने शेवटून दुसरा क्रमांक राखला आहे. सर्वात कमी निकाल गडचिरोली जिल्ह्याचा लागला असून त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा क्रमांक लागतो. वर्धा जिल्ह्यातील १७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यात ८ हजार ८२३ मुले तर ७ हजार ७१७ मुलींचा समावेश होता. पैकी ८ हजार ८१८ मुले व ८ हजार ७१० मुली अशा १७ हजार ५२८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यात ६ हजार ७९३ मुले आणि ७ हजार ७०० मुली असे १४ हजार ४९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल एकूण ८२.६८ टक्के लागला असून मुलींच्या निकाली टक्केवारी ८८.४० तर मुलांची ७७.०४ आहे. यावरून इयत्ता बारावीच्या परीक्षेतही मुलींनीच भरारी घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमानही मुलींनीच पटकाविल्याचे निकालावरून दिसून येत आहे.इयत्ता बारावीमध्ये सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागलेला आहे. विज्ञान शाखेतील ९५.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्या पाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ८८.२९ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल ७४.११ टक्के तर सर्वात कमी निकाल कला शाखेचा ७०.९४ टक्के लागलेला आहे.सीए होण्यासाठी अभ्यासाला केला प्रारंभनागपूर बोर्डातून, राज्यात मुलींतून तथा वर्धा जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ऋतिकाला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रात १०० गुण आहेत. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अथक परिश्रमातून हे यश प्राप्त केल्याचे तिने सांगितले. भविष्यात सी.ए. होण्याची महत्त्वाकांक्षा असून त्या दृष्टीने बारावीची परीक्षा होताच सी.ए. ची तयारी सुरू केल्याचे सांगितले. विविध विषयाची पुस्तके वाचण्याचा छंद तिला बालपणापासून आहे. दहावीत तिला ९४ टक्के गुण होते. तिच्या वडिलांचे येथील इंदिरा गांधी वॉर्डात किराणा दुकान असून आई माधुरी गृहिणी आहे. तिची मोठी बहीण अंजली नागपूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेते आहे तर लहान भाऊ अनुज प्राथमिक शाळेत शिकत आहे. फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने यश प्राप्त केल्याचा आनंद तिच्या कुटुंबीयांच्या चेहºयावर विलसत होता. रितिकाने यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य विष्णू इटनकर व शिक्षकांना दिले.