शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अतिक्रमणधारकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:34 IST

सेवाग्राम भागातील कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात व सेवाग्राम येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था केल्याशिवाय अतिक्रमण काढू नये

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम भागातील कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात व सेवाग्राम येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय अतिक्रमण काढू नयेत अशा सूचना केल्या आहेत. या सूचना अतिक्रमण धारकांना दिलासा देणाºया ठरत आहेत.सदर ठिकाणी जलसंधारणाची व इतर सौंदर्यीकरणाची कामे होणार असल्याने अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २०१७ ला बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सा. बां. विभाग वर्धाचे उपअभियंता, पं.स.चे गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. या बैठकीत सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी काही सूचना केल्या होत्या. एकूण अतिक्रमीत क्षेत्रातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण १६ एप्रिल २०१७ पर्यंत काढण्याबाबत फेरीवाल्यांना नोटीस देवून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही यावेळी सांगण्यात आले ंहोते. ज्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. अशा फेरीवाल्यांसाठी सेवाग्राम हेल्थ सोसायटी येथील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमीत फेरीवाल्यांची नोंदणी ग्रा.पं. सेवाग्राम यांनी करावी व सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटी येथील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये गाळे व जागा उपलब्धतेनुसार अतिक्रमीत फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत सेवाग्राम हेल्थ सोसायटीला कळवावे. शिवाय त्यानुसार जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या होत्या. या सूचना लेखी प्राप्त झाल्यावर सेवाग्राम ग्रा.पं. व कस्तुरबा हेल्थ सोसायटी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सदर छोटे व्यावसायिक दररोज रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर दुकान लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत;पण नायब तहसीलदारांनी २३ नोव्हेंबरला अतिक्रमण काढण्याचे ठरविले व तशा नोटीस फुटपाथ दुकानदारांना दिल्या. परिणामी, दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती जोशी यांनी दुकानदार फेरीवाल्यांना पर्यायी जागा देईपर्यंत अतिक्रमण काढण्यात येवू नये असे आदेश निर्गमित केल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने किशोर देऊळकर यांनी कळविले आहे. याचिकाकर्तांची बाजू अ‍ॅड. सौरव चौधरी यांनी मांडली. न्यायालयाच्या या आदेशामुळे सेवाग्राम मेडीकल चौक भागातील अतिक्रमण करून रस्त्यावर विविध साहित्य विक्रीचे दुकान लावणाºयांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे छोट्या व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.