शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:38 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे.

ठळक मुद्दे‘आस्था’चा उपक्रम : शिलाई मशीनसह गाय व शेळ्या वितरित

आॅनलाईन लोकमतवर्धा : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहे. घरातील कर्त्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा असतो. अशा नाजूक परिस्थितीत सदर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिलासा देण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आस्था चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त पाच शेतकरी कुटुंबियांना गाय, शिलाई मशीन व शेळ्या वितरित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आशीष गुलवाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, डॉ. नितीन जसवंते, बंडू कडू, विलास माहूरे, अ‍ॅड. भाऊसाहेब भांबुरकर, सविता पुरी, गणेश आजणे, आशीष पांडे, प्रवीण वैद्य, जानवी सोळंकी, सोनाली लांडे, भाग्यश्री ईखार, नरेश वडणारे, मोहसीन शेख, पिंटू छांगाणी, प्रवीण देशमुख, सुमीत बिजवे, निलेश एकोनकार, प्रमोद बिजवे, विजय कदम, रंजीत कदम, श्याम कदम आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान धनोडी (ना.) येथील अशोक देढे यांच्या कुटुंबियांना गाय, मांडला येथील अरुण चरपे, चिंचोली येथील उत्तम सयाम, आष्टी तालुक्यातील देविदास ठाकरे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन शेळ्या वितरित करण्यात आल्या. तर वाढोणा येथील शेतकरी वैभव इंगळे यांच्या कुटुंबियांना शिलाई मशीन देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंजुषा येलचटवार यांनी केले. कार्यक्रमात आस्थाच्या विदर्भ समन्वयक पदी बंडू कडू तर अमरावती जिल्हा समन्वयक पदी विलास माहूरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला कैलास ईखार, चिंदुजी झामरे, चंद्रशेखर नेहारे, सुरेश खवशी, नितीन सहारे, डॉ. राऊत, मंगेश टाक, समीर जगताप, धीरज लाडके, शुभम राऊत, प्रज्वल लांडे, शामल देशमुख, योगेश बांडे, मनोज मनवर, नीरज जयस्वाल, इंद्रदास बेनोटे, दिनेश हरले आदींची उपस्थिती होती.सामाजिक बांधिलकी जोपासत वाटचालमागील टप्प्यात सदर संस्थेच्या पुढाकाराने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. इतकेच नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दहा हजार रुपये आणि आष्टी येथील अनाथ भावंडांना शिवसेना व आस्थातर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदत देण्यात आली होती.