शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बंदी झुगारून व्हीआयपी मार्गावर जड वाहतूक

By admin | Updated: April 12, 2017 00:29 IST

शहरातील व्हीआयपी मार्गावरून जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासाठी दोन ठिकाणी लोखंडी खांब लावण्यात आले होते;

बांधकाम विभागाची मूकसंमती : मोठ्या अपघाताची नांदीवर्धा : शहरातील व्हीआयपी मार्गावरून जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासाठी दोन ठिकाणी लोखंडी खांब लावण्यात आले होते; पण काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत विश्रामगृह शेजारचा खांब तुटला. आता या मार्गाने सर्रास जड वाहतूक होत असून बांधकाम विभागाने यांना मूकसंमती तर दिली नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बराच कालावधी लोटूनही तो खांब पूर्ववत केला नाही. शहरातील सिव्हील लाईन भागातील विश्रामगृह ते नालवाडी चौक या मार्गाला ‘व्हीआयपी’ रोड म्हणून ओळखले जाते. सदर मार्गावर तत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याने जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला होता. जड वाहनांची या मार्गाने ये-जा होऊ नये म्हणून नालवाडी चौक तसेच सिव्हील लाईन भागातील विश्रामगृह परिसरात मोठ्या लोखंडी कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेकदा वाहनांच्या धडकेत त्या तुटल्या व बांधकाम विभागाने दुरूस्तही केल्या; पण सध्या नालवाडी चौकातील लोखंडी कमान कायम असली तरी काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत विश्रामगृह परिसरातील लोखंडी कमान तुटली ओह. या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगण्यात येते. लोखंडी खांब तुटल्यानंतर ते दुरूस्त करणे सोडून सदर विभागाने ते रस्त्याच्या कडेला ठेवले आहेत. यामुळे या मार्गाने पुन्हा जड वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. अवजड वाहनांचे चालक या मार्गाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव नेत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे.(शहर प्रतिनिधी)