शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने नदी काठची गावे प्रभावित

By admin | Updated: July 1, 2017 00:39 IST

परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी काठातील गावे प्रभावित झाली आहेत.

ठेंगण्या पुलामुळे अडचण : शेतांना आले तळ्याचे स्वरूप लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी काठातील गावे प्रभावित झाली आहेत. देर्डा (सावंगी) पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. रात्रीला देर्डा, सावंगी, धानोली, आष्टा, नांद्रा, तरोडा आदि गावात रात्रीपासून पाऊस सुरू झाला तो पहाटे पर्यंत सुरूच होता. या पावसामुळे नदी नाले, तुडूंब भरले. बहुसंख्य शेतात पाणी साचल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. देर्डा व सावंगी या दोन्ही गावाच्या मध्यातून बोर व धाम नदीचा संगम होवून वाहत असतो. पुढे या नद्या आष्टा व नांद्रा या दोन गावाच्या मधून वाहतात. दोन्ही ठिकाणी ढोल्यांचे रपट्या प्रमाणे पूल आहे. या पुलांची उंची कमी आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आज दुपारपर्यंत पुलावर कमरे पर्यंत पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. या गावातील नागरिकांना घर गाठण्याकरिता दिंदोडा व शिवनगर अशा फेऱ्यांनी जावे लागले. त्याचा नाहक त्रास या गावकऱ्यांना सोसावा लागला आहे. अशीच काहिशी परिस्थिती आष्टा, नांद्रा या गावकऱ्यांची झाली आहे. आज दिवसभर उन्ह सावलीचा खेळ सुरू असून उन्ह चिडावणारी असल्याने सायंकाळी पाऊस कोसळणार असे संकेत मिळत असल्याचा अंदाज काही गावकऱ्यांनी व्यक्त केला. यातच दुपारी ३ वाजतापासूनच हमदापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी नदी काठची गावे मात्र प्रभावित होवून वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. पुलाची उंची वाढविण्याकडे दुर्लक्ष सावंगी व देर्डा या गावांना जोडणारा पूल कमी उंचीचा आहे. पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळे या भागातील नागरिकांनी या पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला अनेकवार निवेदने दिली; मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका या भागातील नागरिकांना बसत असून प्रत्येक पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढविण्याच्या असलेल्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.