शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ने दुभंगलेली मने अजूनही जुळलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले.

प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ‘पैसा आणि संपत्ती’ हे रक्ताच्या नात्यालाच नाही तर जन्मदात्यांनाही विसरायला भाग पाडतात. अशी परिस्थिती नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने निर्माण केली आहे. या महामार्गामुळे सेलू तालुक्यातील बहीण-भावांच्या पवित्र नात्यातही अंतर निर्माण झाले आहे. आता महामार्ग पूर्ण झाला खरा; पण ही दुभंगलेली मने अद्यापही जुळली नाही. या भाऊबीजेच्या सणाला भाऊ-बहिणींमधील रुसवे फुगवे कायम असल्याने नात्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले. समृद्धी महामार्गाचा मोबदला उचलताना विवाहित बहिणी आडव्या आल्यात. त्यांनी हिस्सा-वाटणीची मागणी केल्याने नात्यांमध्ये वितुष्ट आले. जमिनीचा कोट्यवधीचा मोबदला बघून अनेकांनी ‘मी ही वारसदार’ असा कांगावा सुरू केला. समृद्धी महामार्ग विभागाने शेतीचे विक्रीपत्र करून घेतले त्यावेळी काही बहिणींनी त्यास विरोध केला. त्यामुळे कायदेशीर भावांनाच मोबदला देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे चारभिंतीच्या आतील वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आणि बहीण-भावाचे नाते कायमचे दूर झाले. यातुनच दरवर्षी दिवाळीनिमित्ताने भाऊबिजेला माहेरी, भावाकडे येणारी बहीण गेल्या दोन वर्षांपासून फिरकलीच नाही. यावर्षीही तीच परिस्थिती असल्याने ‘या महामार्गामुळे दोन शहरांमधील अंतर कमी करून शेतकऱ्यांना समृद्ध केले; परंतु रक्तांच्या नात्यांमध्ये कायमचे अंतर वाढवून घराघरात वाद निर्माण केले’ असे मत आता व्यक्त व्हायला लागले आहे.

तिसऱ्यावर्षीही अंतर कायमपैशामुळे बहिणीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या भावाच्या मनातील बहिणीबद्दलचा आदर संपला. काही बहिणींनी पैशाला नाकारून बहीण-भावाच्या नात्याला महत्त्व दिल्याने भावांनीही स्वमर्जीने बहिणींना ओवाळणी म्हणून मोठी रक्कम दिली. मात्र, काहींचे संबंध ताणल्या गेले ते कायमचेच. सलग तिसऱ्या वर्षीही नात्यातील अंतर कायमच असल्याने हा महामार्ग नात्यात वैरी ठरला आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग