शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

वाहनांच्या धुरामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 9, 2014 23:47 IST

वाहनांमध्ये होणार्‍या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून

वर्धा : वाहनांमध्ये होणार्‍या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहराकडे प्रवासी वाहतूक करणार्‍या ऑटोत रॉकेचा सर्रास वापर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील ऑटो चालक खेड्यातील विक्रेत्यांकडून जादा पैसे देऊन रॉकेलची खरेदी करतात. हे रॉकेल इंधन म्हणून ऑटोत वारण्यात येते. या रॉकेलमुळे वाहनातून मोठय़ा प्रमाणात धूर निघतो. या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आता विविध वाहनांमध्ये इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणावर रॉकेलचा वापर होत आहे. ट्रक आणि ऑटो त्यात आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात केरोसिन विक्रेते सामान्य जनतेला रॉकेल नाही म्हणून सांगतात अन् त्यांच्या वाट्याचे रॉकेल वाहनधारकांना विकतात.वाहनांतून निघणार्‍या रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना दमा व श्‍वसनाच्या आजारांनी ग्रासले आहे. डिझेलचे दर वाढल्याने ऑटो चालकांनी रॉकेलकडे धाव घेतली आहे. कमी पैशात जादा उत्पन्न होत असल्याने ऑटो चालक रॉकेल विक्रेत्यांकडे वळत आहे. रॉकेल विक्रेते ग्राहकांना रॉकेल उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ऑटो चालकांना मात्र जादा पैशात रॉकेल उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिकांना हक्काचे रॉकेलसुद्धा मिळणे दुरापास्त झाले आहे.ग्रामीण भागात तर ट्रॅक्टरमध्येही सर्रास रॉकेलचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. रॉकेल विक्रेत्यांची कुणी तक्रार करत नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावत आहे. जादा दराने रॉकेल विकून ते आपली पोळी शेकून घेत आहेत. मात्र गरिबांना रॉकेल मिळणे कठीण झाले आहे. त्यांना महिनाभराचा कोटाही पूर्णपणे मिळतो की नाही, अशी शंका आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)