शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

लाईनमनला मुख्यालयाची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: September 16, 2014 23:57 IST

येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईनमनला मुख्यालयाची अ‍ॅलर्जी झाली का,

झडशी : येथील महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना वा शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईनमनला मुख्यालयाची अ‍ॅलर्जी झाली का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने गावातील रोहित्रावरून वीजपुरवठा खंडित झाला की गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. इतकेच नव्हे तर उमरगाव परिसरातील गेल्या कित्येक महिन्यांपासून रोहित्रावरून शेतातील एकच फेज वारंवार बंद पडतो. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्याला दुरूस्तीला वेळच मिळत नाही. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी वा गावातील नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाईनमनशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता ग्राहकांचे कुठलेही उत्तर मिळत नाही. पाऊस सुरू असताना वा इतर कोणत्याही परिस्थितीचा अडचण भासणार नाही यासाठी वीज दुरूस्ती करताना सर्व व्यवस्था वा साधने महावितरणने कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्यांना समस्येबद्दल सांगितले असता अनेक कारणे सांगून सध्या काम होऊ शकणार नाही अशी कारणे दिली जातात. पावसाळ्यात याचा त्रास नागरिकांना प्रकर्षाने जाणवतो. सतंतधार पाऊस सुरू असला तर संपूर्ण गावाला पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागत असल्याची स्थिती असते. उडवाउडवीची उत्तरे महावितरणचे कर्मचारी नेहमीच देत असल्याचे गावकरी सांगतात. गावातील नागरिकांच्या वा शेतकऱ्यांच्या वीज दुरूस्तीच्या काही समस्या असल्या तर त्यावर संबंधित कर्मचाऱ्याकडून त्वरीत कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना वा ग्राहकांना आपल्या वीज दुरूस्ती संबंधी समस्या त्वरीत दुरूस्त करायची असली तर तालुका अभियंता वा उपअभियंता यांना संपर्क करावा लागतो. नंतरच ग्राहकांच्या, शेतकऱ्याच्या तक्रारीवर अंमलबजावणी केली जाते. अन्यथा खाजगी कारागीराकडून दुरूस्ती करून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. किंवा लाईनमनला सतत विनवणी करावी लागते. रात्रीला महावितरणचा एक कर्मचारी (लाईनमन) गावात राहावा अशी गावातील नागरिकांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करून गावात महावितरणच्या एक लाईनमनला तरी मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.(वार्ताहर)