शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या जाचक अटी ठरताय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

भाव देणाऱ्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे डोकेदुखी ठरणाऱ्या जाचक अटीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ३० ऑक्टोबरपासून वर्धा जिल्ह्यात पाच ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत; पण आतापर्यंत नाफेडने सोयाबीनच्या एकाही दाण्याची खरेदी केलेली नाही. केवळ एकाच शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ : गत वर्षी झाली होती नाममात्र खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जादा भाव देणाऱ्या नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे डोकेदुखी ठरणाऱ्या जाचक अटीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ३० ऑक्टोबरपासून वर्धा जिल्ह्यात पाच ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत; पण आतापर्यंत नाफेडने सोयाबीनच्या एकाही दाण्याची खरेदी केलेली नाही. केवळ एकाच शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केल्याचे वास्तव आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, पुलगाव, आष्टी (शहीद) आणि कारंजा (घा.) येथे नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र ३० ऑक्टोबरला सुरू करण्यात आले आहे. हे पाचही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र शासकीय सुट्टीचा दिवस वगळता तीन महिने सुरू राहणार आहेत.वर्धा, देवळी, पुलगाव आणि आष्टी येथील खरेदी केंद्राकडे सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी एकही शेतकरी फिरकला नसल्याचे वास्तव आहे. तर कारंजा येथील केंद्रावर केवळ एकाच शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे.तशी नोंदणी जिल्हा मार्केटींग विभागाने घेतली आहे. नाफेडकडून सोयाबीनला दिल्या जाणारा तोकडा भाव तसेच सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आता आद्रता असणे यासह आदी जाचक अटी सोयाबीन उत्पादकांसाठी डोकेदुखी ठरणारी असल्याने शेतकऱ्यानीही शासकीय खरेदीकडे पाठ दाखविल्याचे सध्या बोलले जात आहे.गत वर्षी केवळ १० क्विंटल सोयाबीनची खरेदीयंदाच्या वर्षी आतापर्यंत नाफेडच्या पाचपैकी एकाही केंद्रावर सोयाबीनच्या एकाही दाण्याची खरेदी करण्यात आलेली नाही. केवळ एकाच शेतकऱ्यांने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. गत वर्षी नाफेडने वर्धा येथील केंद्रावरून केवळ १० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली होती.सोयाबीनला नाफेड देतेय ३,७१० भावजिल्ह्यात नाफेडचे पाच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आत आद्रता यासह विविध अटींची पूर्तता होत असल्यास सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ७१० रुपये भाव दिल्या जात आहे. असे असले तरी नाफेडच्या पाचही खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या एकाही दाण्याची अद्याप खरेदी झालेली नाही.व्यापाऱ्यांकडून दिवाळी बोनस पिकास समाधानकारक भावशेतकºयांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये सध्या १४ ते १८ टक्केपर्यंत आद्रता असल्याचे दिसून येत असले तरी सोमवारी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला ३ हजार ७५० इतका सर्वात जास्त भाव देण्यात आला आहे. नाफेडकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा ४० रुपये जादा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.परतीच्या पावसामुळे सोयाबीनमध्ये आद्रता जास्तदिवाळी सण साजरा होत असतानाच जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतात कापून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शिवाय ढगाळी वातावरण कायम राहिल्याने सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीन मळणीच्या कामाला गती दिली. शिवाय सोयाबीन थेट बाजारपेठेत विक्रीसाठी नेले. ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन वाळविण्यासाठी वेळच मिळाला नाही. बाजारपेठेत सध्या विक्रीसाठी येणाऱ्यां सोयाबीनमध्ये १४ ते १८ टक्के आद्रता असल्याचे दिसून येत आहे. तर पूर्वी १५ ते २१ टक्केपर्यंत आद्रता विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनमध्ये होती. साठवणुक केल्यानंतर वजन घटेल. शिवाय भविष्यात भावही पडेल याच भीतीमुळे सध्या सोयाबीन उत्पादक आपल्याकडील सोयाबीन थेट बाजारपेठेत नेत व्यापाºयांना विकत असल्याचे बघावयास मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेती