शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
3
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
4
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
5
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
6
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
7
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
8
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
9
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
10
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
11
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
12
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
13
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
14
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
15
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
16
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
17
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
18
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
19
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
20
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?

हवाई सफरीने चिमुकले खूश

By admin | Updated: June 29, 2015 02:19 IST

विमान प्रत्यक्षात दिसते कसे, ते उडते कसे याचे बालमनाला कुतुहूल असते. त्यांची ही उत्कंठा शमवण्याचा अभिनव उपक्रम ‘लोकमत’ने राबविला.

३७ विद्यार्थी दिल्लीत : संरक्षणमंत्र्यांकडून ‘लोकमत’चे कौतुकनवी मुंबई : विमान प्रत्यक्षात दिसते कसे, ते उडते कसे याचे बालमनाला कुतुहूल असते. त्यांची ही उत्कंठा शमवण्याचा अभिनव उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. याअंतर्गत ३७ लहानग्यांना चक्क हवाई सफर घडवून आणली. मुंबई ते दिल्ली या एक दिवसाच्या सफरीचा लहान मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.‘लोकमत’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘संस्कारांचे मोती’ (२०१४) या स्पर्धेत हवाई सफरीसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातून ३५ तर गोवा येथून दोन अशा एकूण ३७ विद्यार्थ्यांना या सफरीचा आनंद लुटता आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या छोट्या दोस्तांनी गुरुवारी पहाटे मुंबई विमानतळावरून विमानातून उड्डाण केले. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या मुलांनी पर्रीकर यांची भेट घेतल्यावर त्यांच्या मनातील संरक्षण दलाविषयीचे अनेक प्रश्न विचारले. त्याला पर्रीकर यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. थेट संरक्षणमंत्र्यांशी भेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. दिल्ली भेटीत विद्यार्थ्यांनी कोटा भवन, रेल्वे म्युझियम, संसद भवन व इंडिया गेट या स्थळांना भेट दिली. कोटा भवन येथे विद्यार्थ्यांना एक शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर नौदलाकडून या मुलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. परतीच्या प्रवासादरम्यान दिल्ली विमानतळावर विद्यार्थ्यांच्या हातातील हे गिफ्ट पॅक आकर्षणाचा विषय ठरले होते.या हवाई सफरीमध्ये महाराष्ट्रातून ‘लोकमत’चे साहाय्यक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे यांच्यासह शरद सुरवसे (मुंबई), संतोष कळसकर (यवतमाळ), संजय गाडेकर (पुणे), विश्वजीत पाटील (कोल्हापूर), सागर लाडे (गोवा) आणि प्रताप शिरसाठ (औरंगाबाद) यांचा सहभाग होता. त्याशिवाय नॅशनल एडिटर हरीश गुप्ता, शीलेश शर्मा, प्रमोद गवळी, प्रवीण भागवत व छायाचित्रकार सुभाष शर्मा यांनीसुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)पंतप्रधान मोदींनी दिल्या होत्या शुभेच्छा गतवर्षी जुलैमध्ये लोकमत ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत राज्यातील ३७ विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. यात विदर्भातील ११ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणात उच्च शिखर गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मोदी यांनी लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या शिबिराचे कौतुकही केले होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी विद्यार्थ्यांचा दिलखुलास संवादराजधानी दिल्लीत या विद्यार्थ्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याची आस्थेने चौकशी करीत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. इतकेच नव्हे, तर आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतले, याची माहितीही या विद्यार्थ्यांना दिली.विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते या वेळी म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना संरक्षण खात्यातील विविध शस्त्रास्त्रांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमासाठी १५ आॅगस्टच्या मुहूर्ताची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.‘लोकमत’ समूहाने ‘संस्कारांचे मोती’ हा अभिनव उपक्रम राबवला. याअंतर्गत विजेत्या ठरलेल्या ३७ विद्यार्थ्यांना मुंबई ते दिल्ली अशी एक दिवसाची सफर घडवली. या हवाई सफरीदरम्यान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या वेळी ‘लोकमत’चे साहायक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, नॅशनल एडिटर हरीश गुप्ता, शीलेश शर्मा यांच्यासह ‘लोकमत’च्या वितरण विभागातील सहकारी उपस्थित होते.