एकनाथ खडसे : बी.जी. चौधरी मार्गाच्या नामफलकाचे अनावरणवर्धा : समाजाला दिशा देण्याकरिता अॅड. बी.जी. चौधरी यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. त्यांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्त्वातून, सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन युवा पिढीने काम करावे, असे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.बडे चौक ते दत्त मंदिर या रस्त्याला अॅड. बी.जी. चौधरी मार्ग असे नाव देण्यात आले. या नामफलकाचे अनावरण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थुल, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया, न्यायमूर्ती अरूण चौधरी, प्रतिभा चौधरी, अॅड. सुनील चौधरी, प्रशांत चौधरी आदींची उपस्थिती होती.ना. खडसे म्हणाले स्व. अॅड. बी.जी. चौधरी यांनी समाजाच्या हितासाठी वकीली केली. न्याय पालिकेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्याचा आम्हाला नेहमीच अभिमान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवास खासगी जागेवर शहराभोवती झालेल्या बांधकामांना नियमित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी ना. एकनाथ खडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष आकाश शेंडे, शंकरप्रसाद अग्निहोत्री, मोहन अग्रवाल, अविनाश सातव, रमेश केला, राजेंद्र शर्मा, अनिल नरेडी, इंद्रकुमार सराफ, नयन सोनवणे, शांता जग्याशी, सुरेश ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी सुरेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार राहुल सारंग, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, सहायक प्रकल्प संचालक अतुल दवंगे आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून युवा पिढीने काम करावे
By admin | Updated: December 20, 2015 02:09 IST