शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

हतबल 467 शेतकऱ्यांना मिळणार 39.24 लाखांची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

वर्धा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदतीची मागणी होताच, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तालुका प्रशासनाला आपला अहवाल सादर केला. त्यानंतर, तालुका प्रशासनाने त्यावर योग्य कार्यवाही करून सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासनाच्या याच आदेशान्वये वर्धा जिल्हा प्रशासनाला ३९ लाख २४ हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, तो जिल्ह्यातील ४६७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला जात आहे.वर्धा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे उभ्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदतीची मागणी होताच, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून तालुका प्रशासनाला आपला अहवाल सादर केला. त्यानंतर, तालुका प्रशासनाने त्यावर योग्य कार्यवाही करून सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. जिल्हा प्रशासनानेही हवालदिल शेतकऱ्यांच्या विषयी सहानुभूती दाखवत सदर प्रस्ताव तातडीने शासनाला सादर केला. त्यानंतर, आता राज्य शासनाने या विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर करून, वर्धा जिल्हा प्रशासनाला ३९ लाख २४ हजार ५०० रुपयांचा निधी दिला आहे. तो जिल्हा प्रशासनाला तालुका प्रशासनाकडे वळता केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय मदतीची रक्कम वळती केली जात आहे. कुठलाही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. 

आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसान-    मार्च, एप्रिल व मे महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. वर्धा तालुक्यातील १४.३० हेक्टर, सेलू तालुक्यातील ७.३० हेक्टर, देवळी तालुक्यातील ३.२५ हेक्टर, आर्वी तालुक्यातील २५२.०७ हेक्टर तर कारंजा तालुक्यातील २ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते, तशी नाेंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती