शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

अल्पवयीन मुलीचा छळ; पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिथुन उर्फ अमित यशवंत चहांदे (रा. नागसेननगर, नालवाडी) यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिन्यांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्पवयीन मुलीचा छळ करीत तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपींना दंडासह कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश -२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. आदोने यांनी दिला.आरोपी मिथुन उर्फ यशवंत चहांदे हा एक वर्षापासून पीडितेचा पाठलाग करायचा. शिवाय पीडितेला लाज येईल असा बोलायचा. पीडितेने या प्रकाराची माहिती तिच्या आई-वडिलांना सांगितल्यावर मिथुन याला समज देण्यात आली. पण २१ सप्टेंबर २०१६ रोजी पीडित ही शिकवणीला जाण्यासाठी निघाली असता त्याने तिचा पाठलाग केला. तर सायंकाळी पीडित ही तिच्या कुटुंबीयांसह घरी असताना आरोपी बाप्या उर्फ विक्रांत वासनिक याच्या गाडीवर मिथुन उर्फ अमित चहांदे, राहुल प्रकाश इंगोले हे आले. पीडिताच्या आजीने तू माझ्या नातीला का त्रास देतो, असे म्हणताच या तिघांनी पीडितेच्या घरावर दगडफेक केली. तर बाप्या उर्फ विक्रांत याने लोखंडी रॉडने पीडितेच्या वडिलांना मारहाण करून पीडित व पीडितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक वासुदेव बोंदरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात एकूण १२ साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मिथुन उर्फ अमित यशवंत चहांदे (रा. नागसेननगर, नालवाडी) यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ नुसार १ वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिन्यांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी राहुल प्रकाश इंगोले (रा. मिलिंदनगर, म्हसाळा) यास भादंविच्या कलम ३२४ नुसार तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तर आरोपी बाप्या उर्फ विक्रांत सुरेश वासनिक (रा. ज्ञानेश्वरनगर, म्हसाळा) यास भादंविच्या कलम ३२४ नुसार तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास आणि भादंविच्या कलम २९४ नुसार दोन महिन्यांचा साधा कारावास ठोठावला. तसेच फौजदारी कलम ३५७ (१) अन्वये नुकसानभरपाई म्हणून एक हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशित केले. पैरवी अधिकारी म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षक दिगांबर गांजरे यांनी काम पाहिले. शासकीय बाजू जिल्हा सरकारी वकील ॲड. गिरीश व्ही. तकवाले यांनी मांडली.

 

टॅग्स :Courtन्यायालय