शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हस्तांतरण बंदीची ३० गावांवर टांगती तलवार

By admin | Updated: July 15, 2014 00:08 IST

शासनाकडून शेतजमिनी मिळाल्या वा प्रकल्पग्रस्त भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना पुनर्वसन अधिनियमानुसार शेतजमिनीचे हस्तांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आखून देण्यात आले आहेत़

वर्धा : शासनाकडून शेतजमिनी मिळाल्या वा प्रकल्पग्रस्त भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना पुनर्वसन अधिनियमानुसार शेतजमिनीचे हस्तांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आखून देण्यात आले आहेत़ या नियमानुसार जिल्ह्यातील १८२ गावांवरील बंदी नुकतीच उठविण्यात आली; पण आणखी ३० गावांवर जमीन हस्तांतरण बंदीची टांगती तलवार आहे़ यामुळे शेतजमिनीचे अनेक व्यवहार अडचणीत सापडले आहेत़जिल्ह्यातील १ हजार ९९९ गावे प्रकल्प बाधित म्हणून ओळखली जातात़ या गावांत अद्याप शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही़ प्रकल्पबाधित नावाखाली अनेक योजना सुरू केल्याचा दावा शासकीय अधिकारी करतात; पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे़ आर्वी, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू या चार तालुक्यांत तर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे़ हे शेतकरी कसत असलेल्या शेतजमिनीबाबत बंदीमुळे कोणतेही व्यवहार करू शकत नाहीत़ अनेक शेतकऱ्यांकडे प्रकल्पबाधित म्हणून अत्यावश्यक दस्तावेज नाहीत़ त्याचा विपरित परिणाम मुलांच्या शैक्षणिक कामांवर होत आहे़ एकत्र कुटुंब असल्यास जमिनीचे अधिकृत दस्तावेज वापरून शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, हा प्रश्नही त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे़ पुनर्वसन कायद्यांतर्गत त्या जमिनीचे कोणतेही व्यवहार करणे अशक्य झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवीत आहे़ जमीन हस्तांतरणाबाबत जाच वाढू लागल्याने काही शेतकऱ्यांनी अर्ज, निवेदने देऊन शासन दरबारी पाठपुरावा केला़ शेतकऱ्यांची गोची झाल्याचे लक्षात आल्याने शासनाने जून महिन्यात पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम १२ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील १९७ गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या़ अखेर तातडीने निर्णय घेऊन आर्वी १६, हिंगणघाट ३६, वर्धा २५ व देवळी तालुक्यातील १२० गावे या जाचातून मुक्त झाले; पण अद्याप जिल्ह्यातील ३० गावे या जमीन व्यवहार बंदीच्या जाचातच अडकून आहेत़ सेलू तालुक्यातील १३ गावांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्याचे समजते; पण त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही़ शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देत ३० गावांतील शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)