शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्यांना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:53 IST

जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली.

ठळक मुद्देभीम आर्मीची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जम्मु-काश्मिरातील कठुवामध्ये आठ वर्षीय बालीकेवर झालेल्या अत्याचाºयाच्या प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम आर्मीच्या वतीने धडक मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के, जिल्हासंघटक आशिष मेश्राम यांनी केले.यावेळी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात काही दिवसांपूर्वी जम्मु-काश्मिरमधील कठूवा, उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे बलात्काराच्या घटना घडल्या. याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटंूबीयांना योग्य न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या देशभरात बलात्कार, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असून सरकार गुन्हेगारांची पाठराखण करीत असल्याबाबत निषेध नोंदवत या अमानवी घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध वर्धेकर सामाजिक संघटनांद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.वर्धेकरांनीही नोंदविला निषेधवर्धा : आसिफा तसेच उन्नव येथील पीडितेवरील अन्यायाबाबतचा जनसामान्यांचा आक्रोश शासन दरबारी पोचविण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले.सरकारला पाठविण्यात आलेल्या निवेदनात, जम्मु येथील आसिफा या ८ वर्षीय बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या करणाºयांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. शासन गुन्हेगारांच्या पाठीशी उभे आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत देशात संविधानात्मक कायद्याची आणि मानवी हिताची शासनव्यवस्था निर्माण व्हावी व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.यावेळी आधार सामाजिक संघटनेचे प्रा.भास्कर इथापे, आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, धरामित्रचे डॉ. तारक काटे, ग्रामसेवा मंडळाच्या करुणा फुटाणे, मार्च फॉर सायन्सचे प्रा. अतुल शर्मा, अध्ययन भारतीचे हरिष इथापे, निर्माण फाउंडेशनचे अमीर अली अजानी, महिला लोक आयोगाच्या सुचिता ठाकरे, रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या संगीता इंगळे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे पंकज वंजारे, जिजाऊ ब्रिगेडच्या माया पवार, संभाजी ब्रिगेडचे मयुर डफळे, राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, सुभाष कांबळे, युवासोशल फोरमचे सुधीर पांगूळ, सलीम कुरेशी, किरण पटेवार, संजय पवार, विक्रम खडसे, स्वाती सगरे, भाग्यश्री बकाले, आरती नेटके, शशिकांत जावळेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.