शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कोरोनायनात एटीएमवर उपाययोजनांना मूठमाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे एकूण २२५ एटीएम आहेत. पूर्वी सर्वच एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक कार्यरत होते. मात्र, आज बोटावर मोजण्याइतपत म्हणजे दोन-चार एटीएमवर सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती वातानुकूलित यंत्रांबाबतीत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा फलक कित्येक एटीएमवर सातत्याने झळकत असतो. बंद वातानुकूलित यंत्रांमुळे एटीएम सुरळीत कार्य करीत नाही. विशेष म्हणजे, अनेक एटीएमची दारे सताड उघडी असतात.

ठळक मुद्देना हॅण्डवॉश, ना सॅनिटायझर : मोजक्याच बँकांत सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाने जिल्ह्यात थैमान घातले असतानाच जिल्ह्यातील एटीएमवर प्रशासनाच्या उपाययोजनांना वाकुल्या दाखविल्या जात असल्याची धक्कादायक बाब रविवारी लोकमत चमूने शहरात केलेल्या पाहणीदरम्यान उजेडात आली.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या संख्येने एटीएम आहेत. एटीएममध्ये मूलभूत सुविधांचा आधीच दुष्काळ आहे. वातानुकूलित यंत्रे कित्येक महिन्यांपासून बंद असून सुरक्षारक्षक नसल्याने सर्वच एटीएम बेवारस ठरत आहेत. स्वच्छतेचाही थांगपत्ता नाही. अनेक एटीएममध्ये चक्क श्वानांचा राबता असतो. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडते आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढतेच आहे. हॅण्डवॉश, सॅनिटायझर आदी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाच्या सूचना असताना शहरातील एकाही एटीएमवर या सुविधा आढळून आल्या नाहीत. दुसरीकडे शहरातील मोजक्यात बँकांत या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे संबंधित बँका आणि एजन्सींचा निष्काळजीपणा आगामी काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर घालणारा ठरू शकेल, अशी वास्तविक परिस्थिती आहे. एटीएम म्हणजे आज सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. बँकेत जाऊन पैसे काढायचे कष्ट एटीएममुळे बऱ्यापैकी कमी झालेत आणि बँकांमध्ये रांगा लागण्याचे प्रमाणही निम्म्यावर आले.संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे एकूण २२५ एटीएम आहेत. पूर्वी सर्वच एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक कार्यरत होते. मात्र, आज बोटावर मोजण्याइतपत म्हणजे दोन-चार एटीएमवर सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती वातानुकूलित यंत्रांबाबतीत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा फलक कित्येक एटीएमवर सातत्याने झळकत असतो. बंद वातानुकूलित यंत्रांमुळे एटीएम सुरळीत कार्य करीत नाही. विशेष म्हणजे, अनेक एटीएमची दारे सताड उघडी असतात. त्यामुळे विरळ भागातील एटीएममध्ये श्वान ठाण मांडून बसलेले असतात. स्वच्छतेचाही अभाव असतानाच कोरोना संक्रमणाच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने धोक्याची घंटा आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना प्रशासनाच्या नियमांशी काही घेणे-देणे नसल्याचेच बँकांच्या बेपर्वाईवरून दिसून येते.सोशल डिस्टन्सिंगचा ठिकठिकाणी फज्जापेन्शनर आणि इतर ग्राहकांची बँकांत व्यवहारासाठी दररोज मोठी गर्दी उसळते. मात्र, बँकांकडून कोरोना नियमांविषयी फारशी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक अंतराचे येथे तीनतेरा होताना दिसतात. याकडेही बँक व्यवस्थापनांचे दुर्लक्ष आहे.जबाबदारी कुणाची?शहरातील बहुतांश एटीएममध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न केला जात आहे.जिल्ह्यात एकूण २२५ एटीएमजिल्ह्यात एकूण २२५ एटीएम असून राष्ट्रीयकृत बँकांचे १४९ तर खासगी बँकांचे ७६ एटीएम आहेत. शहरातील एकाही एटीएमवर हॅण्डवॉश, सॅनिटायझरची सुविधा आढळून आलेली नाही. सुरक्षारक्षकही नाहीत. वातानुकूलित यंत्रणा बंद, अशा अनेक समस्यांनी विळखा घातलेला असताना बँक व्यवस्थापनांची अनास्था कायम आहे.बँक कर्मचाऱ्यांना द्यावे सौजन्याच्या वागणुकीचे धडेजिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी, सहकारी बँकांची संख्या मोठी आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांत खातेदारांना कधीच सौजन्याची वागणूक दिली जात नाही. याचा सर्वसामान्यांना वेळोवेळी प्रत्यय येतो. या बँकांतील गलेलठ्ठ पगाराचे अधिकारी आणि कर्मचारी मस्तवाल झाले आहेत. आमचे कुणी काहीच बिघडवू शकत नाही, या तोऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचारी वावरत असतात. कोरोना संक्रमणाने थैमान घातले असताना बँक व्यवस्थापने अद्याप निद्रिस्त आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :atmएटीएमbankबँक