शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसात गजबजल्या शाळा

By admin | Updated: June 28, 2017 00:52 IST

दोन महिन्यांच्या सुट्यानंतर मंगळवारी शाळांचा पहिला ठोका पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी रिमझिम पाऊस असल्याने कोणी शाळेत येईल

पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत : शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दोन महिन्यांच्या सुट्यानंतर मंगळवारी शाळांचा पहिला ठोका पडला. शाळेच्या पहिल्या दिवशी रिमझिम पाऊस असल्याने कोणी शाळेत येईल अथवा नाही असे वाटत असताना या पावसाच्या उपस्थित शाळेचा हजेरीपट पूर्ण असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद, नगर पालिका व खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागताकरिता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट यांच्यासह इतर पदाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शाळांना भेटी देत चिमुकल्यांचे स्वागत करीत त्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत शिजविण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनाचा चिमुकल्यांसह आस्वाद घेतला. शाळेचा पहिला दिवस असल्याने खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाणाऱ्यांना त्यांच्या वर्गमित्रांना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नव्या वर्गखोलीत आपल्या आवडीचा बाक पकडण्याकरिताही विद्यार्थ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून आले. तर पहिल्यांदाच शाळेत जात असलेल्या नवागतांना शाळा म्हणजे काय, याची उत्सूकता दिसून आली. शाळेत जाताना मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत असल्याचे दिसून आले. तर आपल्या चिमुकल्याला शाळेत सोडताना पालकांची होत असलेली चलबिचल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. चिमुकल्याचे रडणे त्यांना घरी नेण्यास बाध्य करीत होते तर तो शाळेत गेला पाहिजे याकरिता कठोर केलेल्या मनाची तगमग शाळेच्या फाटकाआडून बघणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.