शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलकाला झुडपांचा विळखा

By admin | Updated: December 27, 2014 22:57 IST

ग्रामीण भागाला जिल्हाठिकाणासोबत जोडण्याकरिता जोडरस्ते काढले आहेत. या मार्गावर नागमोडी वळण अथवा अंतर दर्शविण्याकरिता दिशादर्शक फलक लावले आहे. वायगावकडे जाणाऱ्या

वर्धा : ग्रामीण भागाला जिल्हाठिकाणासोबत जोडण्याकरिता जोडरस्ते काढले आहेत. या मार्गावर नागमोडी वळण अथवा अंतर दर्शविण्याकरिता दिशादर्शक फलक लावले आहे. वायगावकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंटचे चबुतरे उभारण्यात आले आहे. प्रत्येक वळणावर तसेच चौरस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा असे चबुतरे आढळतात. मात्र या चबुतऱ्यांना झुडपांचा विळखा असल्याने प्रवाशांची मात्र तारांबळ उडते. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वायगाव मार्गावरील सिमेंटच्या दिशादर्शकाला झुडूपांचा विळखा असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या दिशासर्शक फलकावर काही सूचना, म्हणी लिहलेल्या असतात. यातून चालकांना योग्य संदेश मिळावा असा उद्देश असतो. मात्र फलकच दिसत नसल्याने चालकांचे दिशाभूल होत आहे.आष्टा, तळेगाव, वर्धेकडे जायचे असल्यास प्रवाशांना गावातील नागरिकांना विचारणा करावी लागते. संबंधित गाव कुठल्या मार्गावर आहे. कोणत्या दिशेने जावे लागेल, किती किलोमीटर असे प्रश्न विचारणारे अनेकजण आहेत. कारण गावाच्या अंतराबाबत माहिती देणारे फलकच दिसत नसल्याने वाहन चालकांना नागरिकांकडे विचारणा करण्याखेरीज पर्याय नसतो. या मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकाला रस्त्याचा अदांजच येत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच नवखे प्रवासी यांची अनेकदा दिशाभूल होताना दिसते. ज्या मार्गाने आपण जात आहोत तो मार्ग सदर गावाकडे जाणारा आहे अथवा नाही याचा अदांज अनेकांना येत नसल्याने भलत्याच गावाला पोहचल्याच्या घटना घडतात. याचा मनस्ताप मात्र वाहन चालकाला सहन करावा लागत आहे. येथील काही ठिकाणी सिमेंटचे दिशादर्शक फलक आहेत. यावरील अंतराचा उल्लेख व गावाचे नावच पुसट झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. संबंधित बांधकाम विभागाने दखल घेऊन प्रवाशांना सहकार्य करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)