शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी जागृती सप्ताहातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: May 6, 2016 02:00 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय १ ते ६ मेपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबवित आहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

१ ते ७ मेपर्यंत सप्ताह : विभागाकडून कृषी विषयक माहितीआर्वी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय १ ते ६ मेपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबवित आहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन आमदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी जागृती सप्ताहामध्ये तालुक्यातील गावात सभा घेऊन कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आदी पिकांबाबतची माहिती दिली जात आहे. शिवाय कृषी विषयक विविध योजनांबाबतही गावोगावी सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. बिज प्रक्रिया, माती परीक्षण, उताराला आडवी पेरणी, सरी वरंबा पद्धत, बियाणे बदल, कमी खर्चात करावयाची शेती, रासायनिक खताचा कमी वापर, सेंद्रीय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.कृषी विभागाच्या विविध योजना यांत्रिकीकरण, राष्ट्रीयल फलोत्पादन अभियांतर्गत कांदा चाळ, शेडनेट, पॉलीहाऊस, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देत जागृती केली जात आहे. कृषी जागृती सप्ताहामध्ये क्षेत्रीय स्तरावर मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक गावोगावी सभा घेत आहेत. खरीप हंगामातील पिकांची कमी खर्चात प्रती हेक्टर सरासरी वाढविणे आणि कृषी विभागाच्या विविध योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या कृषी जागृती सप्ताहाचा उद्देश आहे. सप्ताहाच्या यशाकरिता कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)जनजागृती सभाकोरा : कृषी विभागाच्यावतीने समुद्रपूर तालुक्यातील सर्व गावांत कृषी जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत वासी, आसोला, पवनगाव, गांगापूर, खापरी, चापापूर, खेक या गावांत शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. कोरा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. यात कृषी सहायक बाबाराव वागदे, यांनी उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, माती परिक्षण करूनच रासायनिक खताचा वापर, पिकांची निरक्षणे घेऊन किटकनाशकाची फवारणी करणे, पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बिज प्रक्रिया करणे व महत्त्व, कपासी पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड, तंत्रज्ञान, कडधान्याचा पीक पेरा वाढविणे व इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण चौधरी, राम पंढरे, चिंधू शेंडे, शाहु पंढरे व शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)