वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा (वर्धा) मार्फत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता पडेगाव येथे सोयाबीन पिकावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सोयाबिन पिकाबाबत शेतकऱ्यांना प्रथम रेषीय प्रात्याक्षिक कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा अंतर्गत देण्यात आले. यावेळी सोयाबिन पिकावर फवारणीचे तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक डॉ. प्रदीप दवने यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले. फवारणीच्या विविध पद्धतीद्वारे सोयाबीन पिकावर येणाऱ्या तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्या, उंट अळ्या चक्रभुंगा या किडीचे व्यवस्थापन कसे करावे, फवारणी करिता लागणारे आंतरप्रवाही किटकनाशक कसे फवारावे, किटकनाशक आलटून पालटून का फवारावे याबाबत उपस्थिताना माहिती देण्यात आली. सर्वप्रथम शेतकऱ्यांना सोयाबिन पिकाचे पेरणीपासून तर काढणी पर्यंतचे तंत्रज्ञान समजावून सागण्यात आले. पडेगाव गावातील कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील प्रथम रेषीय प्रात्यक्षिकाकरिता निवड केलेले शेतकरी सुरेश केशव मुडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पडेगाव येथील शेतकरी गोविंद तडस, देवनाथ अतुरकर, व्ही. नाईक, आकाश वानखेडे, उत्तम पेटकर, विजय दुर्गे, गणपत पचारे, मंगेश कानेटकर, शुभव घायवट, गणेश भानसेस, पुरूषोत्तम रघाटाटे, आशिष तागडे तसेच कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कार्यानुभवाकरिता कृषी महाविद्यालय नागपूर येथून आलेले १५ विद्यार्थी या कार्यक्रमात हजर झाले होते.या प्रसंगी डॉ. प्रदीप दवने यांनी सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडीची व रोगाची माहिती शेतकऱ्यांना दिली. सध:स्थितीत जमिनीत ओलावा कमी होत चालल्यामुळे सोयाबिन पीक वेळेच्या आधी काढणीस तयार होत आहे. अश्या वेळेला सोयाबिन पिकास १ सुरक्षित ओलीत ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी द्यावे, असे डॉ. यांनी सांगितले. तसेच सोयाबिन पिकावर चक्रभुंगा, उंटअळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळीस ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २५ मिली किंवा क्विनॉलफॉस २० ईसी २० मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी शेतकऱ्यांनी झाडाच्या खालच्या भागातून वरील भागापर्यंत कशी करीवी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर मार्गदर्शन
By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST