शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला रोजगार मिळवून देण्याची हमी

By admin | Updated: October 11, 2015 00:21 IST

येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घराकडे कोणीही फिरकले नाही.

खासदारांसह वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष शेतकऱ्याच्या घरी वायगाव (निपाणी) : येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घराकडे कोणीही फिरकले नाही. त्यांच्या परिवारावर आलेले विदाराक वास्तव ‘लोकमत’ने उजेडात आणले. यानंतर कागदी घोडे नाचविणाऱ्या शासकीय यंत्रणेसह नेत्यांची वाहने या शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे वळू लागली आहेत. शनिवारी खासदार रामदास तडस व वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी झोटींग कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खा. तडस यांनी परिवारातील सदस्यांशी चर्चा करून मुलाला रोजगार देण्याचा शब्द दिला. यावेळी तिवारी व खा. तडस यांनी झोटींग यांच्या घराची पाहणी केली. खासदार तडस यांनी लगेच तात्पूरती आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी मक्त्याने केलेल्या शेतजमीने करारपत्र पाहिले. या कागदावरून शेतकऱ्याला शासकीय मदत देणे शक्य असल्याचे किशोर तिवारी यांनी तहसीलदार यांना सांगितले. शिवाय या शेतकऱ्याला मदत मिळेल, या दृष्टीने कार्य करण्याच्या सूचना तहसीलदार राहुल सारंग यांना यावेळी दिल्या. तसेच मुलाला रोजगारासह पंतप्रधान कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली. यावेळी जि.प. सदस्य मिना वाळके, सरपंच गणेश वादाळे, वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग, कृषी अधिकारी बिपीन राठोड, प्रशांत इंगळे तिगावकर, गुड्डू कावळे, सुनील तळवेकर यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी सकाळी वर्धेतील काही अज्ञात युवकानी नाव न सांगता या कुटुंबांना २ हजार रुपयांची मदत केली.(वार्ताहर)