शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी, नोटबंदीमुळेच देशात मंदीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:12 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित ‘शेतकऱ्यांची दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. बाजार समितीच्यावतीने विविध योजनांचा शुभारंभ तसेच शेतकरी पाल्यांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ठळक मुद्देशरद निंबाळकर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : या सरकारने सुरु केलेला जीएसटी कायदा व नोटबंदी यामुळेच, देशावर मंदीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे उद्योगधंदे व कंपन्यांनी घरघर लागल्याने कर्मचारी कपातीच धोरण अवलंबिल्या जात आहे. एकीकडे नोकरभरती बंद असून दुसरीकडे कर्मचारी कपात केली जात असल्याने बेरोजगारीची दरी कमी होण्याऐवजी आणखीच वाढत आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शेती व्यवसायावरही पडत असल्याचे परखड मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरुडॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित ‘शेतकऱ्यांची दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. बाजार समितीच्यावतीने विविध योजनांचा शुभारंभ तसेच शेतकरी पाल्यांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माजी कुलपती डॉ. शरद निंबाळकर, आमदार रणजीत कांबळे, माधवराव घुसे, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, हिंगणघाट बाजार समितीचे हरीश वडतकर, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, शेष येरलेकर, संजय तपासे, उत्तमराव भोयर, अशोक उपासे, माधुरी चंदनखेडे आदींची उपस्थिती होती. हिंगणघाट बाजार समिती ज्या-ज्या शेतकरी हिताच्या योजना राबवितात त्याची दखल शासनालाही घ्यावी लागते. जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलर फेनसिंग करण्यासाठी बाजार समितीने एक योजना सुरू करावी अशा सूचना यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून करुन बाजार समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शेतकरी हिताच्या योजनांची माहिती दिली. बाजार समितीसमोर सध्या खासगी खरेदीदारांचे मोठे आव्हान आहे. परंतु शेतकऱ्यांनी खासगी व्यापाºयांकडे आपला माल घेऊन जाऊन स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, बाजार समितीमार्फत माल विकला तर मालाला योग्य दाम मिळून वेळीच मोबदला मिळण्याची हमी असल्याचे कोठारी यांनी सांगितले. या बाजार समितीचा आदर्श घेऊन शासनाने शिवपांदण ही योजना सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगून या योजनेसाठी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने बाजार समिती जेसीपी खरेदी करणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमादरम्यान अभियांत्रिकीच्या व्दितीय वर्षात शिकणाऱ्या ८० शेतकरी पाल्यांना लॅपटॉपचे वितरण, बैल मृत्यूमुखी पडलेल्या शेतकºयांना धनादेश वितरण, गोदाम आणि चाळणी संयंत्राचे भूमिपूजन व फळ झाडांच्या वाटपासह सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची किट पाठविण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश डालिया यांनी केले तर आभार संजय तपासे यांनी मानले.

टॅग्स :GSTजीएसटी