शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गटनेता व शिक्षण सभापतीचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:36 IST

येथील नगर पंचायतयतचे काँग्रेस गटनेते तथा शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतीत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत मंगळवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला काँग्रेसमध्ये माजलेली अंतर्गत बंडाळी एक कारण असल्याचेही शहरात बोलले जात आहे.

ठळक मुद्देआष्टी न.पं.तील प्रकार : काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळली

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील नगर पंचायतयतचे काँग्रेस गटनेते तथा शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतीत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत मंगळवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याला काँग्रेसमध्ये माजलेली अंतर्गत बंडाळी एक कारण असल्याचेही शहरात बोलले जात आहे. या राजीनाम्यामुळे चांगलीच खळबळ माजली असून त्यांनी हा राजीनामा आमदार अमर काळे यांना रजिस्टर पोस्टाने पाठविला आहे.शिक्षण सभापती ओंकार भोजने यांनी नगर पंचायतमध्ये जावून कर्मचाºयांकडे राजीनामा दिला आहे. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना त्यांनी नगर पंचायतमध्ये दिवसागणिक भ्रष्टाचार फोफावत आहे. गावातील सर्व कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून १० टक्के कमीशनमुळे दर्जा ढासळत आहे. गावाचा विकास ठप्प झाला आहे. सभागृहात चर्चा होत नाही. सभागृहात आवश्यक बाबीचा विचार न होता काही विशिष्ट नगरसेवक पदाधिकारी यांच्या वरदहस्ताखाली खोटेनाटे देयक मंजूर करून गैरकायदेशिररित्या कारभार चालविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय गटनेता व शिक्षण सभापती या नात्याने माहिती देण्यासही टाळाटाळ होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.गावातील नागरिक मला भ्रष्टाचाराचा जाब विचारतात. नाल्या भरल्या त्या उपसायला दोन महिने कंत्राटदाराचे कर्मचारी येत नाही. सार्वजनिक पथदिवे बसविले. यामध्ये एका लाईटची किंमत ५ हजार आहे. फिलीप्स सारख्या लाईटची किंमत ३ हजार आहे. मग दिल्लीमेड चायनीज कंपनीला एवढी मोठी रक्कम देण्यामागचा हेतू काय, याचा आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षण सभापती आणि गटनेता असून निर्णय व त्याची अंमलबजावणी देखील मला माहिती नाही. शौचालय बांधकाममध्ये गैरप्रकार करणारे कर्मचारी निलंबित झाले. त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले. त्यामुळे मुद्दाम हा सर्व प्रकार सुरू आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला तर माझा आवाज दाबल्या जात आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून मी गटनेता व शिक्षण सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचे ओंकार भोजने म्हणाले.