शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अटीतटीच्या लढतीत गट आला; पण सत्ता गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:14 IST

जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचे निधन झाल्याने गट व गणात प्रत्येकी एक पद रिक्त झाले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक : आजंती गणात राष्ट्रवादी काँग्रेसला यश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/घोराड : जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचे निधन झाल्याने गट व गणात प्रत्येकी एक पद रिक्त झाले होते. यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले असून आज मतमोजणी पार पडली. यात गटाची जागा भाजपाला राखता आली असली तरी गण मात्र हातून निसटला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवाराने आजंती गणात विजय प्राप्त केल्याने तेथील सत्तेचे समीकरणच बदलले आहे.हमदापूर जि.प. गटाचे भाजपाचे सदस्य सुनील शेंडे यांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जि.प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. भाजपाने त्यांचे भाऊ किशोर शेंडे यांना उमेदवारी दिली. यामुळे निवडणुकीचा निकाल एकतर्फी राहील, असा अंदाज वर्तविला जात होता; पण ही निवडणूक अटीतटीची झाली.शनिवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात भाजपाचे किशोर शेंडे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे जगन्नाथ राऊत यांचा २६८ मतांनी पराभव केला. भाजपा उमेदवाराचा झालेला विजय व काँग्रेस उमेदवाराच्या मतांमधील अंतर पाहता मतदारांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर विचारमंथनाची वेळ आणल्याचेच दिसून येत आहे. भाजपाचे किशोर शेंडे यांना ३ हजार ६६२ तर काँग्रेसचे जगन्नाथ राऊत यांना ३ हजार ३९४, मते मिळालीत. शिवसेनेचे शशिकांत देवतळे यांना १ हजार १०२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम डाखोळे यांना ९८० मते मिळालीत.हा जि.प. गट हिंगणघाट विधानसभा मतदार संघात येत असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजपाला गट राखता आला असला तरी गण हातून निसटल्याने एका हिंगणघाट पंचायत समितीमधील सत्ता गमवावी लागणार असल्याचेच दिसून येत आहे.भाजप उमेदवाराचा ६४ मतांनी निसटता पराभवहिंगणघाट - स्थानिक पंचायत समिती अंतर्गत आजंती पंचायत समिती गणाच्या रिक्त सदस्यपदाची पोटनिवडणूक अटीतळीची तथा प्रतिष्ठेची ठरली. यात अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभा आनंदराव देवढे यांनी ६४ मतांनी बाजी मारली. ताब्यातील ही जागा या पोट निवडणुकीत गमविल्याने भाजपाला मोठा हादरा बसला आहे.भाजपचे आजंती सर्कलचे पं.स. सदस्य तथा उपसभापती धनंजय रिठे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पं.स. सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात होते. या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. आज तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. यात विजयी संभा देवढे यांना एकूण २ हजार १२० मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार भास्कर बोबडे यांचा ६४ मतांनी पराभव केला. त्यांना २ हजार ०५६ मते मिळाली. अन्य दोन अपक्ष उमेदवार सुनील काळे यांना ५१७ तर राजेश वसंतराव धोटे यांना ४३९ मते मिळालीत. ५४ मतदारांनी नोटाला पसंती दिली.या निवडणुकीत ७ हजार ९४९ पैकी ५ हजार १८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान ६५.२७ टक्के झाले होते. राकाँचे संभा देवढे विजयी झाल्यानंतर तहसील कार्यालयातून कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून माजी आमदार राजू तिमांडे यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष केला. नंदा तिमांडे यांनी औक्षवण केले. त्यानंतर ही विजयी मिरवणूक बाजार समिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर समारोपीय सभा घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कोठारी, पं.स.चे माजी सभापती संजय तपासे, राजेश कोचर, सतीश वानखडे, संजय घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. सभेला इंटकचे सचिव आफताब खान, नगरसेवक धनंजय बकाणे, प्रकाश राऊत तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाधान शेडगे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सचिन यादव यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.विरोधी गटाचे संख्याबळ समीकरण बदलणारपोटनिवडणुकीच्या निकालाने हिंगणघाट पंचायत समितीमधील एकूण १४ सदस्यांपैकी सत्तारूढ भाजपाची सदस्यसंख्या सातवरून आता सहावर आली तर विरोधकांचे संख्याबळ आता सातवरून आठवर पोहोचले आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे प्रत्येकी तीन तर शिवसेना व स्वभाप यांचे संख्याबळ प्रत्येकी एक राहणार आहे. यामुळे पं.स.च्या रिक्त उपसभापती पदासाठी भाजप विरोधकांची दावेदारी वाढली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक