शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:59 IST

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यातच तालुक्यात जलसंकट

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसाचा चांगलाच फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. दमदार पाऊस होत पावसाचे पाणी पाहिजे तसे जमिनीत मुरले नसल्याने मार्च महिन्याच्या सूरूवातीलाच अनेक विहिरींनी तळ गाठल्याचे बघावयास मिळते. शिवाय सध्या घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना भटकंतीच करावी लागत आहे. या जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य पाऊले उचलावित. शिवाय नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील खुबगाव, वाठोडा, दहेगाव, पाचेगाव, गुमगांव, वाढोणा, पिंपळखुटा, चांदणी, रोहणा, वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, शिरपूर (बोके) आदी गावातील विहिरींनी मार्च महिन्याच्याच सुरूवातीला तळ गाठल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे उन्हाळ्याच्या पुढील दिवसांमध्ये हे जलसंकट भीषण रुप धारण करेल असा कयास बांधल्या जात आहे. तालुक्यातील बहूतांश नद्या कोरड्या पडल्या आहेत. शिवाय ज्या नदी पात्रात नाममात्र पाणीसाठा आहे तो पुढील तीन महिने टिकणार नसल्याने आताच प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय, सध्या शेतकऱ्यांसह पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. परंतु, पशुसंवर्धन विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असल्याने त्याच्या कार्यप्रणालीवर नागरिकांसह पशुपालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विहिरींना मुबलक पाणी असते तर चारा समस्येवर शेतकऱ्यांच्या सहकार्यने मात करता आली असती. परंतु, विहिरींनी तळ गाठल्याने पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. जंगलातही पाणी नसल्याने आणि वनविभागानेही कृत्रिम पाणवठे व्यवस्थित करीत त्यात पाणी न भरल्याने वन्यप्राणीही उन्हाळ्यात गावांकडे धाव घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिलांना करावी लागतेय भटकंतीआर्वी शहरातील शिरपूर रोड, एल.आय.जी. कॉलनीच्या मागील भागातील वसाहतीत नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी ही उपाययोजना तेथील लोकसंख्येच्या मानाने अपुरी पडत आहे. हीच परिस्थिती शहरातील आणखी काही भागात आहे. काही नागरिकांनी याची माहिती लोकप्रतिनिधींना देत समस्या निकाली काढण्याची मागणी केली.