शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:09 IST

ऐतिहासिक पार्श्वभूमी तथा कलावंतांची विपुलता असलेले वर्धा शहर नाट्यगृहापासून वंचित होते. ही उणीव आता भरून निघणार आहे. शासनाने वर्धेतील नाट्यगृहाला हिरवी झेंडी दिली आहे.

ठळक मुद्दे२४.६८ कोटींची तरतूद : सांस्कृतिक विभागातर्फे पाच कोटी

ऑनलाईन लोकमतवर्धा : ऐतिहासिक पार्श्वभूमी तथा कलावंतांची विपुलता असलेले वर्धा शहर नाट्यगृहापासून वंचित होते. ही उणीव आता भरून निघणार आहे. शासनाने वर्धेतील नाट्यगृहाला हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी तत्सम शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. यात नाट्यगृहासाठी २४ कोटी ६८ लाख ३१ हजार ९९२ रुपयांची तरतूद करण्यात आली. आ.डॉ. पंकज भोयर यांनी कलावंत तथा माध्यमांची मागणी लक्षात घेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.सांस्कृतिक विभागातर्फे पाच कोटी तथा उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून राज्य शासनाच्या वित्त विभागाने मंजूर केली आहे. राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाला प्राधान्य देत हा निधी मिळवून दिला आहे. हे नाट्यगृह १००० आसन क्षमतेचे राहणार असून तळमजल्यावर ४२८.९७ चौरस मीटरवर आर्ट गॅलरी राहणार आहे. कुणालाही अडथळा होणार नाही, अशी आसनव्यवस्था असणार आहे. कलावंतांच्या सुविधेसाठी स्टेजच्या बाजूला ग्रीन रूम, व्हीआयपी व्यवस्था, प्रसाधनगृह, प्रकाश आवाज नियंत्रण व्यवस्था तथा दोन्ही बाजूंनी रूंद कॅरिडॉर, मोठे पोर्च राहणार आहेत.पहिल्या माळ्यावर कलावंताच्या निवासाची तथा रंगित तालिमीची व्यवस्था केली जाणार आहे. उच्च दर्जाचे इंटेरिअर डेकोरेशन, अ‍ॅकॉस्टिक सिस्टिम व्यवस्था, स्वागत द्वार, पार्किंग व्यवस्था व संरक्षण भिंत तथा इतर सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. नाट्यगृह निर्मितीने कलावंत, रसिक व आयोजकांची कोंडी दूर होईल. राज्य व देशपातळीवरील कलावंतांना कलेचे सादरीकरण करता येणार आहे. सेवाग्राम आश्रम, परमधाम आश्रम पवनार व जिल्ह्यात हिंदी विश्वविद्यालय सारख्या संस्था आहेत. त्यात नाट्यगृहाची भर पडणार आहे.सांस्कृतिक सभागृहाची मागणी जुनी आहे. २० ते २५ वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष झाले. ही मागणी कलावंतांनी पुन्हा एकदा रेटली. दोन वर्षांपासून हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता. यातील कागदपत्राची पूर्तता करून आ.डॉ. भोयर यांनी वित्तमंत्री, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला.