शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विभागाद्वारे नोंदणीसाठी ग्रास ई-चलन प्रणाली सुरू

By admin | Updated: March 12, 2015 01:32 IST

मुद्रांक व नोंदणी फी भरण्यासाठी ग्रास या प्रणालीद्वारे थेट ई. चलन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्या दस्ताएवजाची नोंदणी अनिवार्य आहे, ...

वर्धा : मुद्रांक व नोंदणी फी भरण्यासाठी ग्रास या प्रणालीद्वारे थेट ई. चलन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्या दस्ताएवजाची नोंदणी अनिवार्य आहे, अशा सर्व दस्ताऐवजासाठी ई चलन प्रणालीचा वापर करावा, अशी माहिती सह जिल्हा मुद्रांक निबंधक अनुप हांडा यांनी दिली.ग्रास या प्रणालीवर नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. सर्व पक्षकारांना मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी मुद्रांक शुल्क व नोंदणीसाठी वेगवेगळे चलन बनवावे लागत होते. परंतु नव्या पद्धतीमुळे एकाच चलनाने भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही पद्धत अचूक असल्यामुळे जनतेला सुलभपणे व अचूक शुल्क भरणे सोईचे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.ज्या दस्तांची नोंदणी अनिवार्य आहे अशाच दस्तांसाठी ई-चलन सुरू केले आहे. तरीही काही नागरिकांकडून चुकीने अनोंदणीकृत दस्तांसाठी शुल्क-ई-चलनाद्वारे भरले जाते होते. नवीन पेजवर नोंदणीकृत दस्तांसंदर्भातच ई-चलन बनवले जात असल्याने नागरिकांनाच प्रश्नातून योग्य पर्याय निवडावा लागतो. त्यामुळे अनोंदणीकृत दस्तांस ई-चलन तयार होण्याची शक्यता नाही. चलन बनवताना होणाऱ्या तृटीमुळे विभागाकडे परतावा प्रकरणांचे प्रमाण खूपच वाढले होते. नवीन प्रणालीमध्ये या चुका कमी होणार असल्याने नागरिकांना परतावा प्रकरणातील त्रास दूर होऊन अधिक सेवा मिळण्याचे ध्येय पूर्ण होणार आहे. तसेच विभागाची माहिती भरणे अधिक सोपी झाल्याने विभागाशी यापूर्वी संबंध न आलेले नागरिकही याचा फायदा घेऊ शकणार आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी फी एकत्र भरता येणार असल्यामुळे नोंदणी फी साठीची वेगळी चलने कमी होऊन ग्रास प्रणालीवरील ताण कमी होणार असल्याची माहिती सह जिल्हा मुद्रांक निबंधक अनुप हांडा यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)