शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक ठरतेय गुरांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: August 19, 2016 02:13 IST

प्राणिमात्रावर प्रेम करणे ही फार चांगली बाब आहे; पण पुरेशी व्यवस्था न करता प्राण्यांचे हाल केले जात असल्याचे दिसून येते

मोकाट जनावरांवर ओढवतोय मृत्यू : गोपालकांनी दक्षता घेणे गरजेचे वर्धा : प्राणिमात्रावर प्रेम करणे ही फार चांगली बाब आहे; पण पुरेशी व्यवस्था न करता प्राण्यांचे हाल केले जात असल्याचे दिसून येते. यात आपली गुरे मोकाट सोडून त्यांचे आरोग्य खराब केले जात आहे. बुधवारी पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रममध्ये एका गाईचा मृत्यू झाला. गाईच्या पोटातून २५ ते ३० किलो प्लास्टिक निघाले. यामुळे मोकाट सोडलेल्या जनावरांकरिता प्लास्टीक कर्दनकाळच ठरत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या गाई, बैलांना जेरबंद करण्याची मोहीम नगर परिषद प्रशासन एक महिन्यापासून राबवित आहे. यात जनावरे पकडून पिपल फॉर अ‍ॅनिमल्सद्वारे संचालित पशु अनाथ आश्रमात ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी पशु मालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. यामुळे बहुतांश पशुपालक घरी जनावरे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ती सोडवत नाहीत. या जनावरांना शहरात कचरा खाण्याची सवय जडलेली असते. यामुळे ही जनावरे हिरवा वा सुखा चारा खात नाही. कालांतराने कमजोरी येऊन गुरे खाली बसतात व बरेचदा या गुरांचा मृत्यूही होतो. यातीलच एक गाय करुणाश्रमात बुधवारी दगावली. शवविच्छेदनात सुमारे २५ ते ३० किलो प्लास्टिकचा कचरा गाईच्या पोटातून निघाला. यामुळे गोपालकांनी घरी गाई पाळताना केवळ श्रद्धेपोटी न पाळता त्यांच्या सकस आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. असे झाले तरच गोसेवा होऊ शकते. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना सडका भाजीपाला व कचरा खाण्याची सवय असल्याने गोठ्यात टाकलेला हिरवा चाराही ही जनावरे खात नाही. यामुळे पशुपालकांनी आपली पाळीव जनावरे मोकाट न सोडता घरीच काळजी घ्यावी, असे आवाहन पिपल फॉर अ‍ॅनिमल व पालिकेने केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)