शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत राज्यातील नऊ व्यक्तींना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:00 IST

Wardha News Tobacco Free Campaign राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देटोबॅको फ्री इंडिया पुरस्काराने सन्मानित नरोत्तम सेखसरिया व सलाम मुंबई फाउंडेशनचा उपक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्याच्या शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. हे अभियान सक्षम करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींना टोबॅको फ्री इंडिया पुरस्कार आणि अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात राज्यातील ९ व्यक्तींचा समावेश आहे.

सलाम मुंबई फऊंडेशनच्यावतीने २००७-०८ पासून राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवित आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम शालेय आणि गाव स्तरावर अधिक मजबूत व्हावा याकरिता नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन ही सेवाभावी संस्थाही विकासात्मक कार्य करीत आहे. तंबाखू नियंत्रण कार्यास आधिक बळकटी देण्याकरिता दर दोन वर्षांनी देशभरातून पाच सेवाभावी संस्थांची आणि व्यक्तींची निवड केली जाते.  यावर्षी पाच सेवाभावी संस्था आणि दहा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना मिळणाऱ्या अनुदानातून समाजाचे आरोग्य चांगले राहावे, सर्व मुले आणि समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी खर्च केले जातात. यावर्षी राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे व द युनियनचे क्षेत्रीय उपसंचालक डॉ. राणा सिंग यांच्या उपस्थितीत पुरस्कार व अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

देशातील सात राज्यात कार्यतंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ लाख २१ हजार ७६० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या उपक्रमत आजापर्यंत ५८५ सेवाभावी संस्था सहभागी झाल्यात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  राज्यात १२ हजार १२१ डीएड आणि बीएड विद्यार्थी, १५ हजार ३८९ पोलीस प्रशिक्षित करण्यात आलेत. सलाम मुंबई फाउंडेशनच्या कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संस्थेला प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील यशानंतर आता सलाम मुंबई फाउंडेशनने भारतातील सात राज्यांत तंबाखूमुक्त शाळांचे काम स्थानिक शासनासोबत सुरू केले आहे.

या व्यक्तींना मिळाले अनुदानतंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता राज्यातील ९ व्यक्तींना अनुदान देण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सरोज जगताप व ज्योती देशमुख, साताऱ्याचे अनिल नामदेव जाधव, नंदुरबारचे रवी गोसावी, यवतमाळ येथील कैलास गव्हाणकर, वर्ध्याचे नरेश वाघ, कोल्हापुरातील शशिकांत कदम, धुळ्याचे पंकज शिंदे व सांगलीचे रामचंद्र टोणे यांचा समावेश आहे.

अनुदान मिळालेल्या सामाजिक संस्थामुव्हमेंट फॉर अल्टनेर्टीव्ह अ‍ॅण्ड युथ अव्हेरणेस (कर्नाटक), एफर्ट संस्था (आंध्र प्रदेश), शिक्षित रोजगार केंद्र समिती (राजस्थान), बुंदेलखंड सेवा संस्थान (उत्तर प्रदेश) व बालाजी सेवा संस्थान (उत्तराखंड) या सेवाभावी संस्थांना अनुदान देण्यात आले आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी