शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रंथालयांचे अनुदान थकलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

ग्रंथालयांना यंदा ५९ टक्केच अनुदान पदरात पडले आहे. त्यामुळे या ग्रंथालयांना  वेळेत उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध न झाल्याने, त्याचा परिणाम, ग्रंथालयांच्या पुस्तक खरेदीवर, तसेच क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात ३१ मार्च, २०२० अखेर सुमारे १२ हजार १४९ ग्रंथालये कार्यरत आहेत. या ग्रंथालयातील ११४ ग्रंथालये वर्धा जिल्ह्यात आहेत. या ग्रंथालयांना पहिल्या टप्प्यातील ५९ टक्के निधी उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्दे११४ ग्रंथालयांतील २०८ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ : पुस्तक खरेदीवर परिणाम

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलती वाचन संस्कृती, तुटपुंजे अनुदान, यामुळे ग्रंथालयांच्या स्थितीवर विपरित परिणाम झाला आहे. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून देण्यात येणारा ४० टक्के निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ग्रंथालयांची वाट खडतर झाली आहे.जिल्ह्यात ११४ ग्रंथालये असून, २०८ कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रंथालयांना दोन टप्प्यांत वेतन आणि वेतनेतर अनुदान दिले जाते. ग्रंथालयांना यंदा ५९ टक्केच अनुदान पदरात पडले आहे. त्यामुळे या ग्रंथालयांना  वेळेत उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध न झाल्याने, त्याचा परिणाम, ग्रंथालयांच्या पुस्तक खरेदीवर, तसेच क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात ३१ मार्च, २०२० अखेर सुमारे १२ हजार १४९ ग्रंथालये कार्यरत आहेत. या ग्रंथालयातील ११४ ग्रंथालये वर्धा जिल्ह्यात आहेत. या ग्रंथालयांना पहिल्या टप्प्यातील ५९ टक्के निधी उपलब्ध झाला आहे.अनुदानात ४० टक्क्यांनी घट झाली असतानाच, कोरोनामुळे ग्रंथालयांच्या वाचक संख्येतही २० ते ३० टक्क्यांनी फरक पडला आहे. त्यामुळे ग्रंथालयांना मिळणाऱ्या  वर्गणीवरही परिणाम झाला आहे. अनेक ग्रंथालयांच्या जागेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याद्वारे मिळणाऱ्या भाड्यातून ग्रंथालयांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे अद्याप सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ग्रंथालयांना या उत्पन्नालाही मुकावे लागत आहे. मिळालेल्या अनुदानात कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे की पुस्तक खरेदी करायचे, असा प्रश्न ग्रंथालय प्रशासनापुढे आहे.

टॅग्स :libraryवाचनालय