शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
2
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
3
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
4
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
5
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
6
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
7
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
8
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
9
"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
11
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
12
भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!
13
विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?
14
Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!
15
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
16
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
17
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
18
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
19
आजचा अग्रलेख: ड्रॅगन-हत्तीच्या मैत्रीची मजबुरी
20
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!

निराधारांना अनुदान अत्यल्प

By admin | Updated: May 6, 2016 01:58 IST

केंद्र शासनाद्वारे जीवन मूल्य वृद्धींगत करणे, विकास साधण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; ...

महागाईत ६०० रुपयांत कसे भागणार ? : निराधारांचा शासन, प्रशासनाला सवालपुरूषोत्तम नागपुरे आर्वीकेंद्र शासनाद्वारे जीवन मूल्य वृद्धींगत करणे, विकास साधण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; पण या योजनांतील अत्यल्प अनुदान व त्यातही विलंब होत असल्याने निराधारांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या निराधारांना ६०० रुपये प्रतिमाह अनुदान दिले जाते. या अल्प अनुदानात महिनाभर जगायचे कसे, असा सवाल लाभार्थी उपस्थित करीत आहेत.आर्वी उपविभागात शहर व ग्रामीण क्षेत्रामध्ये एकूण १९ हजार ४६२, आष्टीमध्ये ६ हजार ८०५ व कारंजा तालुक्यात ४ हजार ६११ लाभार्थी आहे. निराधार योजनेत प्रती लाभार्थी केवळ ६०० रुपये महिना अनुदान मिळते; पण शासनाच्या अनेक योजनांप्रमाणेच यातही नियमित अनुदान दिले जात नाही. कधी तीन महिने तर कधी सहा महिन्यांपर्यंत लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळत नाही. महागाई प्रचंड वाढल्याने ही सहायता रक्कम कुचकामी ठरत असून उपजीविका करणे अवघड झाले आहे. या योजनेत १८ ते ६५ वर्षांतील निराधार व्यक्तींना राज्यशासनातर्फे प्रती व्यक्ती ६०० रुपये व एकाच परिवारात दोन व्यक्ती निराधार असल्यास ९०० रुपये आर्थिक मदत दिली जाते; पण योजनेतील बहुतांश लाभार्थी साक्षर नसल्याने पोस्ट वा बँकेतून पैसे उचलताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. १९८० मध्ये ही योजना सुरू झाली. प्रारंभी प्रती व्यक्ती दरमहा केवळ २५० रुपये व एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना ६०० रुपये आर्थिक मदत मिळत होती. तब्बल २८ वर्षांनंतर आर्थिक साह्यतेमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत मिळणारी ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याची ओरड होत आहे. अधिकारिक माहितीनुसार, या योजनेचा लाभ वयाच्या ६५ वर्षांपर्यंतच घेता येतो. यापेक्षा अधिक वय असणाऱ्या निराधारांसाठी इंदिरा गांधी निराधार योजना व महिला अनुदान योजना सुरू करण्यात आली होती; पण आता ही योजना वरील योजनेत सामावून घेण्यात आली आहे. यामुळे ६५ वर्षांवरील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेत सामावून घेण्यात आले आहे. उल्लेखनीय असे की, परिवार प्रमुखाच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पत्नीला लाभ मिळू शकतो; पण त्या व्यक्तीच्या १८ वर्षाखालील मुलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. असे असले तरी केवळ ६०० रुपयांमध्ये संपूर्ण परिवाराची उपजीविका कशी करायची, हा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. निराधार योजनेत नाव देण्यासाठी तहसील स्तरावर समितीचे गठन केले आहे; पण बहुतांश नागरिकांना या योजनेची माहिती नाही. यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ही माहिती नसल्याने व ते उपलब्ध नसल्याने बहुतांश नागरिक निराधार असताना लाभापासून वंचित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संगणमत करून व खोटी कागदपत्रे तयार करून या योजनेत बोसग लाभार्थ्यांचा शिरकाव करीत असल्याचे दिसते. गठित समितीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे लाभधारकांची प्रकरणे केल्यानंतरही अधिकारी व कर्मचारी मलिदा मिळणाऱ्या प्रकरणांत रस घेतात. खरी प्रकरणे बाजूला ठेवून बोगस लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.आर्वी उपविभागात निराधार योजनेचे २२ हजार ८७७ लाभार्थीआर्वी तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे २ हजार ०७५, श्रावणबाळ योजनेचे ९ हजार ३८७, कारंजा तालुक्यात संजय गांधीचे १ हजार १६४, श्रावणबाळचे ३ हजार ४४७ तर आष्टी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १ हजार ५४९ व श्रावण बाळचे ५ हजार २५५ लाभार्थी आहेत. या प्रकरणांमध्ये अनेक बोगस लाभार्थ्यांचा शिरकाव संबंधित कर्मचाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. यातून कर्मचारीही महिन्याकाठी कमाई करीत असल्याची ओरड होत आहे. यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेमध्ये काय घोटाळा झाला, याबाबत मला सांगता येणार नाही. मला या विभागाचा कारभार हाती घ्यायला चार दिवसच झाले आहेत; पण चौकशी करण्यात येईल.- श्याम कावटी, संजय गांधी योजना प्रमुख, नायब तहसीलदार, आर्वी.