वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे आयोजित राष्ट्रीयस्तरावरील ‘मेघ-मल्हार’ हिंदी सिनेगीत गायन स्पर्धेच्या महाकरंडकाचा सन्मान नागपूरच्या एनकेपी साळवे आयुर्विज्ञान संस्थेच्या चमूला प्राप्त झाला. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या महाअंतिम स्पर्धेत मुलांमधून लोणी, अहमदनगर येथील प्रवरा आयुर्विज्ञान संस्थेच्या रूरल मेडिकल कॉलेजचा क्षितीज गोखले सर्वोत्कृष्ट ठरला. मुलींमधून सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार शरद पवार दंत महाविद्यालयाच्या सायली इंगळे हिला प्राप्त झाला. स्पर्धेतील वैयक्तिक द्वितीय पुरस्कार एनकेपी साळवे आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉ. सुरेश अय्यर व डॉ. पायल कटरे यांना प्राप्त झाला. तृतीय पुरस्कार औरंगाबाद येथील महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या भौतिकोपचार विभागातील गौरी घन आणि अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऋषभ पारिसे यांना प्राप्त झाला. विजेत्यांना प्रत्येकी प्रथम २१ हजार, द्वितीय ११ हजार आणि तृतीय ७ हजार रुपयांचे रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी खासदार व विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, विश्वस्त शालिनी मेघे, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, विद्यापीठाचे मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, प्रकुलगुरू डॉ. व्ही.के. देशपांडे, स्पर्धा संयोजक संजय इंगळे तिगावकर, परीक्षकगण सूरमणी वसंत जळीत, प्रा. संध्या देशमुख, संगीतकार अजय हेडाऊ, गझलगायक नितीन वाघ, स्वाती पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या महाअंतिम फेरीत पिपल्स परिचारिका महाविद्यालय (भोपाळ), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (लातूर), पी.टी. स्कूल अॅॅड सेंटर (नागपूर), जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, शरद पवार दंत महाविद्यालय, राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालय (सावंगी), महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था (सेवाग्राम) येथील विद्यार्थी चमूचा सहभाग होता. पुरस्कार विजेत्यासोबतच, मुलींमध्ये सिनी जॉन, श्रुती गुळतकर, कविता मुरलीधरन, स्रेहा सवांग, कौमुदिनी हटवार, श्रीलक्ष्मी, श्रद्धा मामीडवार, उर्वी सावंत तर मुलांमधुन सिद्दीकी सैफ अहमद, अक्षय पचारणे, अनुप बेंडे, व्यंकटेश जयस्वाल, संकेत गोंगे, रामस्वरुप राजपूत, शिशिर मेश्राम, पंकज रणधीर या विद्यार्थ्यांना प्र प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आदित्य खांडेकर यांनी केले.(प्रतिनिधी)
एनकेपीची चमू ‘मेघ मल्हार’ स्पर्धेची महाविजेता
By admin | Updated: September 28, 2015 02:28 IST