शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग

By admin | Updated: June 28, 2015 02:34 IST

तालुक्यात होत असलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

सर्वच पक्ष सरसावले : उमेदवार शोध मोहिमेलाही प्रारंभसेलू : तालुक्यात होत असलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच मोर्चेबांधणीला वेग आला आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सरसावले असून उमेदवार शोध मोहिमही सुरू झाली आहे.राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या येळाकेळी व हिंगणी तसेच चारमंडळ ग्रा.पं. ची सार्वत्रिक निवडणूक २५ जुलै रोजी होत आहे. हिंगणी ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थित तर येळाकेळी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचा कब्जा आहे. निवडणुका जाहीर होताच उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. आरक्षित जागेवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गावपुढारी कामाला लागले आहेत. सध्या तालुक्यात जयस्वाल, शेंडे, रणनवरे व आमदाराचा गट सक्रिय आहे. पक्षाच्या नावावर निवडणुका लढविल्या जाणार नसल्या तरी जयस्वाल व शेंडे गट विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आल्याने व भाजपामध्ये दोन गट सक्रिय असल्याने नेते एकत्रित आले असले तरी कार्यकर्ते एकत्र येतात काय, हे या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. भाजपाचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढल्यास तालुक्यात भाजप व काँग्रेस समर्थित उमेदवार आमने-सामने राहण्याची शक्यता आहे. तालुक्याचे लक्ष हिंगणी व येळाकेळी ग्रा. पं. निवडणुकीकडे लागले आहे. सत्तारूढ गट विकास कामावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. गावापुरती निवडणूक असली तरी या दोन ग्रामपंचायतींवर आपल्या गटाची सत्ता राहावी म्हणून जिल्हा व तालुका पातळीवरील राजकीय नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)