शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ग्रामपंचायती पूर्णत: सौर ऊर्जेवर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:36 IST

भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प्रकल्प ........

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : सोलर पार्क, बांबू लागवडीसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प्रकल्प विकास आराखडे तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.सेवाग्राम येथील यात्री निवासात सेवाग्राम विकास आराखड्यातील १४५ कोटी रुपयांच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी सूचना दिल्यात. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपअभियंता संजय मंत्री आणि अड्याळकर असोसिएटचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये एकूण ७८ कामे हाती घेण्यात आली असून पैकी १८ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.पर्यटकांना महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रासोबतच त्यांचा सहवास लाभलेल्या गावांचा इतिहास, भारताच्या संस्कृतीचे दर्शन आदींची माहिती थ्रीडी चित्र प्रर्दशित करणाऱ्या थिएटरद्वारे देण्यात यावी. गांधींजीचा सहवास लाभलेल्या २५ गांवाना सेवाग्राम सर्किट असे नाव देऊन त्या २५ ग्रामपंचायती पूर्णपणे सोलरवर कार्यान्वित करण्यासाठी ७५ कोटी रुपये देण्यात यावे, यासाठी परिसरात जागा शोधून १ मॅगावॅट वीजनिर्मिती करून सोलर पार्क तयार करावा, या सोलर पार्कमध्ये सोलर शेड तयार करून शेडमध्ये महिला बचतगटांना लघु उद्योगासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, सेवाग्राम परिसरात ५० एकर जागा उपलब्ध करून बांबू लागवड करावी. या बांबू लागवडीतून रोजगार हमी योजनेवरील मजुरांना कामे मिळून त्यांचा आर्थिक स्त्रोत वाढेल. या कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने आराखडा तयार करून तत्काळ सादर करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.तत्पूर्वी त्यांनी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत झालेले हुतात्मा स्मारकासमोरील सभागृह, भारतातील सर्वात मोठा चरखा आणि यात्री निवासच्या कामाची पाहणी केली. यावेळी सभागृह परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. बैठकीनंतर त्यांनी बापूकुटीत जात प्रार्थना केली.दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करावर्धा: जिल्हा महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची पावनभूमी आहे. या दारुबंदी जिल्ह्यात देशी-विदेशी दारुविक्री जोमात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात दारुबंदीचे कडक कायदे करून दारुबंदीची कठोर अंमलबजावणी करावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदार आणि दारुबंदी महिला मंडळांची वर्षातून दोनदा संयुक्त बैठक घ्यावी, प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्त केंद्रे सुरू करून दारू तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी, शासकीय कार्यालयात दारुबंदीसंदर्भात जनजागृती फलक लावावी, दारुबंदी महिला मंडळांना मानधन देण्यात यावे तसेच दारूच्या पंचनाम्यावर पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सरपंच किंवा दारुबंदी मंडळापैकी एक तरी सदस्यांची स्वाक्षरी असावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाखा प्रत्येक तालुक्यात सुरू करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आदी मागण्यांचे निवेदन महात्मा गांधी दारूमुक्ती संघटनेच्यावतीने पालकमंत्री बावनकुळे यांना देण्यात आले.घरकुल लाभार्थी महिलेने मागितली आत्महत्येची परवानगीवर्धा: आमगाव (मदनी) गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया म्हसाळा येथील रहिवासी असलेल्या अर्चना किसना मसराम यांना २०१७-१८ मध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले. तेव्हा २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर घराचे ले-आऊट टाकून राहते घर पाडण्यात आले. त्यानंतर काही उसनवारी रक्कम गोळा करून घराचा जोता बांधण्यात आला. त्यानंतर बाधकामासंदर्भात ग्रामपंचायत सचिवाला प्रमाणपत्र मागितले असता सचिवाने घर गावठाणात येत नसल्याचे कारण सांगून प्रमाणपत्र दिले नाही. घरकुल मंजूर झाले आणि पहिला धनादेशही निघाल्याने राहते घर पाडले. पण, आता हे बांधकामच रखडल्याने हा परिवार उघड्यावर आला आहे. या संदर्भात न्याय मिळण्याकरिता सरपंच, सचिव, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह आमदार, खासदार यांच्या भेटी घेतल्या; पण न्याय मिळाला नाही. सध्या किरायाच्या घरात दिवसे काढावे लागत असून कर्जबाजारीपणा वाढला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. एक तर न्याय द्यावा अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी अर्चना मसराम यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPankaj Bhoyarपंकज भोयर